मागेल त्याला नव्हे, २०० शेतकऱ्यांनाच शेततळी
By Admin | Published: May 5, 2016 12:07 AM2016-05-05T00:07:28+5:302016-05-05T00:12:42+5:30
राजेश खराडे ल्ल बीड मोठा गाजावाजा करीत मागेल त्याला शेततळे या योजनेला जिल्ह्यात सुरवात झाली होती. कमी अनुदान आणि सध्याची दुष्काळी परिस्थिती यामुळे योजनेला खीळ बसली आहे.
राजेश खराडे ल्ल बीड
मोठा गाजावाजा करीत मागेल त्याला शेततळे या योजनेला जिल्ह्यात सुरवात झाली होती. कमी अनुदान आणि सध्याची दुष्काळी परिस्थिती यामुळे योजनेला खीळ बसली आहे. हजारोच्या संख्येत प्रस्ताव दाखल होऊन अद्यापपर्यंत केवळ ४९ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे.
मागेल त्याला शेततळे ही योजना कृषी विभागाच्या दृष्टीने महत्वाची होती. २४८० शेततळ्याचे उद्दीष्ट असताना शुल्क दर भरून ५४६५ शेतकऱ्यांनी आॅनर्लाइन व रजिस्टरद्वारे कृषी विभागाकडे अर्जही केले. पैकी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सर्व पाहणी करून ६८९ शेततळ्यांचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र सध्याची दुष्काळी परिस्थितीमुळे मंजूरी मिळूनही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कामाकडे पाठ फिरवली आहे.
जिल्ह्यात ४९ शेततळ्यांपैकी केवळ बीड तालुक्यात २९ इतर दहा तालुक्यांमध्ये २० शेततळी पूर्ण झाली आहे. तर १५१ शेततळ्यांचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात ७ लाख ३२ हजारांवर शेतकऱ्यांची संख्या आहे त्यामुळे मागेल त्याला नव्हे तर फक्त २०० शेतकऱ्यांना शेततळ्याचा फायदा होणार आहे.
अजूनही प्रक्रिया सुरू असली तरी १५ मार्चनंतर या योजनेचे काम रखडलेले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण होते की नाही याबाबत शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.
अनुदान वाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
शेततळ्याकरीता ५० हजाराचे अनुदान देण्यात आले आहे. प्रशासनाकडून अनुदान रकमेत वाढ होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कामांना सुरूवात केलेले नाही. शेततळ्याचे प्रस्ताव दाखल करून घ्यावेत म्हणून शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागत होती. उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकाऱ्यांनाच कामे सुरू करावीत म्हणून शेतकऱ्यांच्या मागे लागण्याची वेळ आली आहे.