पाऊस नव्हे, अंदाजही ढगातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:23 AM2017-08-18T05:23:51+5:302017-08-18T05:23:53+5:30
हवामान खात्याने वर्तविलेले सर्व अंदाज खोटे ठरवत पावसाने ढगातच दडी मारल्याने मराठवाड्यातील शेतक-यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
मयूर देवकर ।
औरंगाबाद : हवामान खात्याने वर्तविलेले सर्व अंदाज खोटे ठरवत पावसाने ढगातच दडी मारल्याने मराठवाड्यातील शेतक-यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
मान्सूनचे अनुमान काढताना हवामान खात्य२ाने यंदा चांगला पाऊसकाळ असल्याचे भाकित वर्तविले होते. यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच मान्सून नेहमीपेक्षा आधी येणार, राज्यात धो धो पाऊस पडणार, असे आशादायी वातावरण निर्माण करण्यात आले होते. ३० मे रोजी केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. २ किंवा ३ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार असे सांगण्यात आले; पण सर्वांचे अंदाज चुकवत मान्सून केरळमध्येच रेंगाळला. जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार रोहिण्या बरसल्यामुळे हवामान खात्याने मान्सूनपूर्व पावसालाच मान्सून घोषित करण्याची घाई करून शेतकºयांना खोटी आशा दाखवली. पाऊस दाखल झाला असे समजून शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर खरिपाची लागवड केली. वेळेच्या आता पाऊस दाखल होण्याचे भाकित खोटे ठरवून जून महिन्याच्या मध्यावर मान्सून बरसला. त्यामुळे शेतकºयांचे खूप नुकसान झाले.
१४ व १५ जून रोजी औरंगाबादमध्ये ७४.६ मि.मी. पाऊस पडला. त्यानंतर मराठवाड्यात पावासाने १५ दिवस दड२२ी मारली. असे एकामागे एक पावसाचे अनुमान चुकत गेले. त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. पाण्याअभावी पिके करपू लागली. शेतीकामे, खते, बी-बियाणे, डोक्यावर कर्जाचा डोंगर अशा कात्रीत सापडून बळीराजा हवालदिल झाला. काही शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये खरीप पेरणीत अंदाजे २ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे अनुमान आहे.
जुलै महिना तर शेतकºयांची अग्निपरीक्षा पाहणाराच ठरला. मुंबईतील कुलाबा वेधशाळेने १५ जुलैनंतर मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन होण्याची घोषणा केली. परंतु ही आशादेखील फोल ठरली. औरंगाबामध्ये १० जुलैनंतर आजतागायत एकदाही दिवसभरात ८ मि.मी पाऊसदेखील पडलेला नाही. पिकांनी माना टाकल्या आहेत. मराठवाड्यात आतापर्यंत केवळ ३८ टक्के पाऊस पडला आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची समस्या निर्माण झाली आहे.
>पावसाचा अंदाज आणि वस्तुस्थिती
यंदा ९६ टक्के पाऊस पडेल सध्या तरी तशी स्थिती नाही
२ किंवा ३ जून रोजी मान्सूनचे आगमन अंदाज चुकला, मान्सून केरळमध्येच रेंगाळला
१५ जुलैनंतर मराठवाड्यात पाऊस अंदाज खोटा ठरला
२०१५ साली ९३ टक्के पाऊस प्रत्यक्षात ८६ टक्के पाऊस
२०१३ साली ९८ टक्के पाऊस प्रत्यक्षात १०६ टक्के पाऊस
>शेतकºयांची न्यायालयात धाव : हवामान खात्याच्या लहरी अनुमानांना कंटाळून माजलगाव तालुक्यातील गंगाभीषण थावरे या शेतकºयाने दिंदू्रड पोलीस ठाण्यात कुलाबा व पुणे वेधशाळांनी शेती उत्पादन कंपन्यांशी मिळून खोटे अंदाज वर्तवून शेतकºयांची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकºयांनीदेखील खोट्या भाकितांमुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्यामुळे या वेधशाळांविरोधात न्यायालयात जाण्याची घोषणा केली होती.
>१९ आॅगस्ट रोजी अतिवृष्टीचे भाकीत
पुणे वेधशाळेने १९ आॅगस्ट रोजी मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सुमारे ५० दिवस ओढ दिल्यानंतर आता तरी ढग बरसतील, अशी आशा निर्माण झाली आहे.