'कर भरल्याची पावती मिळेना, सूट किती कळेना'; मालमत्ता कराने फोडला नागरिकांना घाम !

By मुजीब देवणीकर | Published: April 25, 2023 04:25 PM2023-04-25T16:25:53+5:302023-04-25T16:26:17+5:30

स्मार्ट सिटीने मालमत्ता कराचे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यासाठी १० कोटी रुपये देऊन मार्कस कंपनीला नेमले.

'Not receiving tax payment receipt, not knowing how much exemption'; Citizens broke the property tax! | 'कर भरल्याची पावती मिळेना, सूट किती कळेना'; मालमत्ता कराने फोडला नागरिकांना घाम !

'कर भरल्याची पावती मिळेना, सूट किती कळेना'; मालमत्ता कराने फोडला नागरिकांना घाम !

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : एप्रिल ते जून महिन्यात मालमत्ता कर भरला तर काही टक्के सामान्य करात सूट देण्याची घोषणा मनपाने केली. सर्वसामान्य नागरिकांनी वॉर्ड कार्यालयांमध्ये आठ दिवसांपासून अलोट गर्दी करण्यास सुरुवात केली. अवघ्या सहा दिवसांत १ कोटी ६८ लाख रुपये जमा झाले; मात्र नागरिकांना पावती, सूट किती याचा तपशील मिळायला तयार नाही. दहा कोटी रुपये खर्च करून मार्कस कंपनीचे सॉफ्टवेअर घेण्यात आले. त्यानंतरही सॉफ्टवेअरमध्ये प्रचंड त्रुटी आहेत.

चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना एप्रिल महिन्यात १० टक्के, मे महिन्यात ८ टक्के आणि जून महिन्यात ६ टक्के सवलत दिली जात आहे. नऊ वॉर्ड कार्यालयात १० ते १५ एप्रिल दरम्यान सहा दिवसांत रोख स्वरूपात ६२ लाख ६८ हजार ९९४ रुपये, धनादेश स्वरुपात ७१ लाख ५ हजार ३३१ रुपये, डिमांड ड्राफ्टद्वारे २४ लाख ९८ हजार ८६५ रुपये, ऑनलाईन भरणा ९ लाख २४ हजार ६५८ रुपये असे एकूण १ कोटी ६७ लाख ९७ हजार ८४८ रुपये कर जमा झाला. सर्वाधिक कर झोन नऊमधील मालमत्ताधारकांनी भरला. त्यापाठोपाठ झोन ५, झोन ७, झोन ४, झोन १, झोन ८ चा क्रमांक लागतो.

अडचणींचा डोंगर
स्मार्ट सिटीने मालमत्ता कराचे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यासाठी १० कोटी रुपये देऊन मार्कस कंपनीला नेमले. कंपनीचा दोन वर्षांचा कार्यकाल संपला. पूर्वीपेक्षा अनेक अडचणी येत आहेत. वॉर्ड कार्यालयात दररोज भांडणे होत आहेत. पैसे भरल्यावरही सॉफ्टवेअर थकबाकी दाखवते. सामान्य करात सूट मिळाल्याची पावती मिळत नाही. मागील थकबाकी, विद्यमान रक्कम यांचा तपशील मिळत नाही. ऑनलाईन पैसे भरले तरी अनेक अडचणी आहेत.

काही ठिकाणी अडचणी
मार्कस कंपनीने बऱ्यापैकी काम केले आहे. काही ठिकाणी थोड्या फार अडचणी आहेत. त्यावर काम सुरू आहे. लवकरच साॅफ्टवेअर अद्ययावत होईल.
- अपर्णा थेटे, करमूल्य निर्धारण अधिकारी, मनपा.

वॉर्ड कार्यालयनिहाय जमा रक्कम
झोन - रक्कम (लाखात)
१ - १२,९६,१८४
२- ०७,५७,०३०
३- ०६,६१,८३३
४- १३,७४,९८८
५- ३७,७८,२२३
६- ०९,२५,२५६
७- २५,५८,२५०
८- १०,६३,९९१
९- ४३,८२,०९३
एकूण १,६७,९७,८४८

Web Title: 'Not receiving tax payment receipt, not knowing how much exemption'; Citizens broke the property tax!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.