शिर्डी नाही, छत्रपती संभाजीनगरचे ‘टेकऑफ’; शहरातूनच अधिक विमानांचे उड्डाण

By संतोष हिरेमठ | Published: July 22, 2023 07:36 PM2023-07-22T19:36:44+5:302023-07-22T19:40:01+5:30

रोज दोन हजार प्रवाशांची ये-जा, मात्र नव्या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढीची प्रतीक्षा

Not Shirdi, the 'takeoff' of Chhatrapati Sambhajinagar; More flights from the city itself | शिर्डी नाही, छत्रपती संभाजीनगरचे ‘टेकऑफ’; शहरातूनच अधिक विमानांचे उड्डाण

शिर्डी नाही, छत्रपती संभाजीनगरचे ‘टेकऑफ’; शहरातूनच अधिक विमानांचे उड्डाण

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शिर्डी विमानतळामुळे छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला मोठा फटका बसला. मात्र, आजघडीला विमानांच्या उड्डाणांत चिकलठाणा विमानतळाने शिर्डी विमानतळाला मागे टाकले आहे. विमानांचे उड्डाण वाढलेले आहे, परंतु नव्या शहरांना हवाई कनेक्टिव्हिटी मिळण्याची छत्रपती संभाजीनगरची प्रतीक्षा कायम आहे.

शिर्डीला जाणारे दिल्ली, मुंबई, हैदराबादेतील भाविक पूर्वी विमानाने छत्रपती संभाजीनगरला येत आणि नंतर रस्ते मार्गाने शिर्डीला जात. मात्र, शिर्डी विमानतळ सुरू झाल्यानंतर या तिन्ही शहरांतील भाविक थेट शिर्डीस जाऊ लागले. त्यामुळे शहरातील विमानसेवेबरोबर विमानांच्या संख्येवरही परिणाम झाला. या सगळ्यात गेल्या काही दिवसांत शिर्डी येथील विमानांचे उड्डाण हे छत्रपती संभाजीनगरपेक्षा कमी झाले आहे. छत्रपती संभाजीनगरहून दररोज दोन हजार प्रवासी ये-जा करीत आहेत.

कुठे किती विमानांचे उड्डाण?
शिर्डीतून आजघडीला बंगळुरू, विजयवाडा, इंदूर, हैदराबाद, दिल्ली आणि चेन्नई या ६ शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. यामध्ये चेन्नईची विमानसेवा अनियमित असल्याचे सांगण्यात आले. या उलट छत्रपती संभाजीनगरातून ८ विमानांची ये-जा होत आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू आहे.

शहरातील रोजचे विमान प्रवासी
तारीख - जाणारे- येणारे

१६ जुलै - ७९९-८०८
१५ जुलै - ९०१-९६८
१४ जुलै - ७४२-८४७
१३ जुलै - ८८९-९२९
१२ जुलै - ७४८-७८९
११ जुलै - ८९०-९२६
१० जुलै-८५२-७७२

वर्षभर प्रवासी
शिर्डीत धार्मिक पर्यटन असते. पावसाळ्यात कमी गर्दी असल्याने विमाने कमी केली असल्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यटक, उद्योजक, विद्यार्थी असे वर्षभर प्रवासी असतात. छत्रपती संभाजीनगरहून जयपूर, उदयपूर विमानसेवेसाठी प्रयत्न केला जात आहे. या हवाई मार्गाचा उड्डाण योजनेत समावेश करण्याचीही मागणी केली आहे.
- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी (एटीडीएफ),

विमानसेवा वाढीसाठी प्रयत्न
छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीपेक्षा अधिक विमाने उड्डाण होत आहेत. छत्रपती संभाजीनगरहून अहमदाबाद, उदयपूरसाठी विमानसेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
- जसवंत सिंग, अध्यक्ष, टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन (एटीडीएफ)

Web Title: Not Shirdi, the 'takeoff' of Chhatrapati Sambhajinagar; More flights from the city itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.