१४ जणांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:07 AM2017-09-23T01:07:58+5:302017-09-23T01:07:58+5:30
सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजविण्यावर बंदी असताना डीजे वाजवून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ जणांना उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत़ त्यामुळे शहरातील डीजे चालकांवर दंडात्मक कार्यवाहीची टांगती तलवार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजविण्यावर बंदी असताना डीजे वाजवून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ जणांना उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत़ त्यामुळे शहरातील डीजे चालकांवर दंडात्मक कार्यवाहीची टांगती तलवार आहे़
एप्रिलपासून झालेल्या महापुरूषांच्या जयंती, उत्सव काळात काढलेल्या मिरवणुकांमध्ये डीजे वाजविल्यामुळे जयंती मंडळाच्या अध्यक्षावर विमानतळ ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते़ यासंदर्भातील अहवाल उपविभागीय पोलीस अधिकाºयांना पाठविण्यात आला होता़ त्यांच्या आदेशानंतर संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ अधिक आवाजात डीजे वाजवून पर्यावरण संरक्षण अधिनियम सन १९८६ व ध्वनिप्रदूषण नियम सन २००० व सुधारणा नियम २०१ अन्वये कारवाई करण्यात आली होती़ या कारवाईमुळे पदाधिकाºयांसह डीजेचालक धास्तावले आहेत़