जिल्ह्यातील ३४ रुग्णालयांना नोटिसा !
By Admin | Published: May 15, 2017 11:48 PM2017-05-15T23:48:27+5:302017-05-15T23:50:41+5:30
लातूर : धडक मोहिमेत जिल्ह्यातील ३९२ पैकी २५६ खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : धडक मोहिमेत जिल्ह्यातील ३९२ पैकी २५६ खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली असून, या तपासणीत ३४ रुग्णालयांत किरकोळ त्रुटी आढळल्या आहेत. त्यांना त्रुटींची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. तशा नोटिसाही संबंधितांना दिल्या असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक यांनी सांगितले.
आरोग्य विभाग, महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे २५६ रुग्णालयांची ३० एप्रिलअखेर तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर १५० पैकी १४० सोनोग्राफी केंद्र, १२१ पैकी ११६ एमटीपी सेंटरची तपासणी करण्यात आली. १४ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत २३ पथकांद्वारे तपासणीची मोहीम राबविण्यात आली असून, संबंधित पथकांनी सादर केलेल्या अहवालात ३४ रुग्णालयांत प्रशिक्षित (अधिक वृत्त हॅलो/२ वर)