रांजणगावात ३८९ अतिक्रमणधारकांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 10:47 PM2019-05-03T22:47:22+5:302019-05-03T22:47:46+5:30

उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायीने शासकीय गायरान व महार हडोळा जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटीसा दिल्या जात आहेत.

 Notice to 38 9 encroachers in Ranjanga | रांजणगावात ३८९ अतिक्रमणधारकांना नोटीसा

रांजणगावात ३८९ अतिक्रमणधारकांना नोटीसा

googlenewsNext

वाळूज महानगर : उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायीने शासकीय गायरान व महार हडोळा जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटीसा दिल्या जात आहेत. आतापर्यंत ३८९ अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.


रांजणगाव शेणपुंजी गावातील शासकीय गायरान व महार हाडोळा जमिनीवर अतिक्रमणे करुन अनेक गरीब कामगार व नागरिकांनी पक्की घरे बांधली आहे. येथील शासकीय गट क्रमांक २, ५५,७५, ७६, ७७,७८, ७९, ८२, ८३ व ८४ मधील गायरान व महार हाडोळा जमिनीवर जवळपास ४ हजार घरे बांधण्यात आली असल्याच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या दफ्तरी आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी शेख सिंकदर यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. यावर तीन महिन्यांपूर्वी सुनावणी होऊन अतिक्रमणे ६ महिन्यांत निष्कासित करण्याचे आदेश न्यायालयाने ग्रामपंचायतीला दिले.

लोकसभा निवडणुकीमुळे प्रक्रिया बंद होती. ती पुन्हा सुरु करण्यात आली असून, संबधित अतिक्रमणधारकांना १५ दिवसांत स्वत:हून अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना नोटिसीद्वारे देण्यात आल्या आहेत. मुदतीत अतिक्रमणे न हटविणाºया अतिक्रमणधारकांवर कारवाई केली जाणार आहे.

संबधितांकडून अतिक्रमण काढण्यासाठी झालेला खर्चही ग्रामपंचायत वसुल करणार असल्याचा इशारा नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८९ अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावल्याचे ग्रामविकास अधिकारी रोहकले यांनी सांगितले.

Web Title:  Notice to 38 9 encroachers in Ranjanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.