सहा बीडीओंना नोटीस
By Admin | Published: May 2, 2016 11:42 PM2016-05-02T23:42:17+5:302016-05-02T23:49:20+5:30
बीड : तेराव्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल सादर करण्यात सहा गटविकास अधिकाऱ्यांनी हलगर्जी केल्याचे समोर आले आहे. सीईओंनी त्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
बीड : तेराव्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल सादर करण्यात सहा गटविकास अधिकाऱ्यांनी हलगर्जी केल्याचे समोर आले आहे. सीईओंनी त्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
बीडचे गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे, केजचे विठ्ठल नागरगोजे, गेवराईचे बी. डी. चव्हाण, पाटोद्याचे बी. आर. धीवरे, माजलगावचे ए. बी. गुंजकर, अंबाजोगाईचे डी. बी. गिरी यांचा समावेश आहे. तेराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून केलेली कामे, खर्च केलेला निधी, शिल्लक निधी याबाबत (ए टू एन) या परिशिष्टात अंतिम अहवाल पंचायत विभागाने मागविला होता; परंतु केवळ पाच गटविकास अधिकाऱ्यांनी तो सादर केला. अहवाल सादर न करणाऱ्या बीडीओंना सीईओ नामदेव ननावरे यांनी नोटीस बजावली आहे. तीन दिवसात खुलासे सादर करावयाचे होते. मात्र, त्यानंतरही बीडिओंनी खुलासे सादर केलेले नाहीत. ननावरे यांनी एक वर्षाची वेतनवाढ रद्दची तंबी दिल्याने गटविकास अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)