निवडणुकीची माहिती न देणाऱ्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 06:30 PM2019-01-12T18:30:32+5:302019-01-12T18:30:46+5:30
निवडणुकीबाबत कर्मचा-यांची माहिती न देणा-या औरंगाबाद तालुक्यातील विविध सरकारी कार्यालयांना उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांनी शुक्रवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २४ तासांच्या आत संबंधित कार्यालय प्रमुखांना नोटीसचा खुलासा करावा लागणार आहे.
औरंगाबाद : निवडणुकीबाबत कर्मचा-यांची माहिती न देणा-या औरंगाबाद तालुक्यातील विविध सरकारी कार्यालयांना उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांनी शुक्रवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २४ तासांच्या आत संबंधित कार्यालय प्रमुखांना नोटीसचा खुलासा करावा लागणार आहे.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका यावर्षी होणार आहेत. त्या अनुषंगाने संबंधित सरकारी कार्यालयातील कर्मचा-यांची माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालयास देण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या; परंतु त्याकडे कार्यालयांनी दुर्लक्ष केले. मनपा वॉर्ड कार्यालय, वस्तू व सेवाकर कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, वन्य रक्षक कार्य आयोजन विभाग, प्राचार्य शासकीय कला महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद, शासकीय अध्यापक महाविद्यालय, शासकीय विद्यानिकेतन, महापालिका शाळा, जि.प. मल्टी सर्व्हिसेस हायस्कूल, जि.प. प्राथमिक शाळांना बाणापुरे यांनी नोटीस बजावल्या आहेत.