औरंगाबादेत २० हजार बेशिस्त वाहनचालकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:20 AM2018-06-14T00:20:30+5:302018-06-14T00:21:22+5:30

वाहतूक नियम मोडून बिनधास्त वाहने चालविणाऱ्या तब्बल २० हजार वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी चालकांच्या छायाचित्रासह घरपोच नोटिसा पाठविल्या आहेत.

Notices to Aurangabad 20 thousand unskilled motorists | औरंगाबादेत २० हजार बेशिस्त वाहनचालकांना नोटिसा

औरंगाबादेत २० हजार बेशिस्त वाहनचालकांना नोटिसा

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतूक पोेलिसांची कारवाई : सहायक आयुक्त शेवगण यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वाहतूक नियम मोडून बिनधास्त वाहने चालविणाऱ्या तब्बल २० हजार वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी चालकांच्या छायाचित्रासह घरपोच नोटिसा पाठविल्या आहेत.
विना हेल्मेट दुचाकीचालक, विना सीटबेल्ट चारचाकीचालक, विरुद्ध दिशेने जाणारे वाहनचालक, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणारे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक, काळीपिवळी जीपचालक, नो एंट्रीत बिनधास्तपणे वाहने पळविणारे, विना गणवेश आणि विना लायसन्स, तसेच वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणाºया वाहनचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
शहर वाहतूक पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवून, तसेच विविध प्रकारच्या उपाययोजना करूनही बेशिस्त वाहनचालकांवर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. ही बाब लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहर वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाºया वाहनचालकांचे छायाचित्र सेफ सिटी कॅमेºयाने घेऊन त्यांना घरपोच नोटिसा देण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून वाहतूक पोलीस सेफ सिटी कॅमेºयांंत कैद झालेल्या बेशिस्त वाहनचालकांच्या नावे नोटिसा तयार करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. रोज सरासरी ७० ते ८० नोटिसा तयार होतात आणि संबंधित वाहतूक शाखेकडे पाठविल्या जातात. अशा प्रकारे वर्षभरात २० हजार वाहनचालकांना नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त सी. डी. शेवगण यांनी दिली.
तारेवरची कसरत
पाच ते सहा वर्षांपासून आरटीओने सर्व वाहनांच्या नोंदणीचे डिजिटल रेकॉर्ड तयार केले. यामुळे वाहतूक नियम मोडून पळणाºया वाहनाच्या नंबर प्लेटवरून गाडीमालकाचा पत्ता मिळवून त्या पत्त्यावर नियम तोडल्याची नोटीस वाहन आणि चालकाच्या छायाचित्रासह पाठविण्यासाठी शहरातील सिडको, शहर, छावणी आणि वाळूज वाहतूक शाखेने कर्मचारी नियुक्त केले. बºयाचदा बाहेरगावचे आणि खेड्यातील वाहने शहरात कार्यरत असतात. अशा वाहनांच्या मालकांना नोटिसा पोहोचविणे शक्य होत नाही, तर भाडेकरू वाहनचालक घर बदलून जातात, परिणामी नोटीसची अंमलबजावणी करणे शक्य होत नाही.

Web Title: Notices to Aurangabad 20 thousand unskilled motorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.