प्राप्तीकर विभागाच्या शेतकऱ्यांना नोटिसा
By Admin | Published: March 18, 2016 01:02 AM2016-03-18T01:02:04+5:302016-03-18T01:52:20+5:30
जालना : बँक खात्यातील व्यवहारांवरून जिल्'ातील जवळपास ६ हजार शेतकऱ्यांना प्राप्तीकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत
जालना : बँक खात्यातील व्यवहारांवरून जिल्'ातील जवळपास ६ हजार शेतकऱ्यांना प्राप्तीकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी कृषी क्षेत्र व शेतकरी असताना दुसरीकडे प्राप्तीकर विभागाने छोट्या शेतकऱ्यांनाही वारंवार नोटिसा पाठविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जालना जिल्ह्यात गत चार वर्षांपासून दुष्काळीस्थिती आहे. व्यापार, उद्योगही थंडावलेले आहेत. असे असले तरी प्राप्तीकर विभागाने छोट्या शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. जालना तालुक्यातील वाघ्रळ येथील एका शेतकऱ्याने बहुराष्ट्रीय कंपनीकडून सीड्स प्लॉट घेतला. याच्या उत्पादनातून एकरी चांगले उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे, हे व्यवहार रोखीने न होता धनादेशाद्वारे होतो आणि संबंधित कंपनी याबाबतचा कर सरकारकडे जमाही करते. मात्र तरीही या शेतकऱ्याच्या नावे प्राप्तीकर विभागाची नोटीस निघाली आहे. या शेतकऱ्याने संबंधित कंपनीशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली.
अनेक वर्षांपूर्वींच्या प्रकरणांतही अनेक शेतकरी, छोटे व्यापारी, उद्योजक आणि डॉक्टरना प्राप्तीकर विभागाने वारंवार नोटिसा बजावल्या आहेत.
एकीकडे प्राप्तीकर विभागाने प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश या खात्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे याची अद्याप अमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)