साखर आयुक्तांकडून पाच कारखान्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:55 PM2019-02-23T23:55:40+5:302019-02-23T23:56:10+5:30
महाराष्टÑातील १५, तर औैरंगाबाद विभागातील तब्बल पाच कारखान्यांनी उसाचे पैसे थकविले आहेत. नियमानुसार शेतकऱ्यांना पंधरा दिवसांमध्ये पैैसे देणे प्रत्येक कारखान्याला बंधनकारक आहे.
साखर आयुक्तांकडून पाच साखर कारखान्यांना नोटिसा
औैरंगाबाद : महाराष्टÑातील १५, तर औैरंगाबाद विभागातील तब्बल पाच कारखान्यांनी उसाचे पैसे थकविले आहेत. नियमानुसार शेतकऱ्यांना पंधरा दिवसांमध्ये पैैसे देणे प्रत्येक कारखान्याला बंधनकारक आहे. मागील तीन महिन्यांपासून निव्वळ चालढकल सुरू आहे. दुष्काळामुळे अगोदरच शेतकरी होरपळून निघत आहे, त्यात साखर कारखान्यांकडून आणखी चटके देण्यात येत आहेत. साखर आयुक्तांनी पाच कारखान्यांना नोटिसा बजावल्यानंतरही पैसे मिळत नसल्याचा आरोप आज एका पत्रकार परिषदेत करण्यात आला.
अॅड. के. ई. हरिदास, गंगाभीषण थावरे, सुभाष लोमटे यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्र आणि राज्य शासनाने चालू आर्थिक वर्षात उसाचे दर निश्चित करून दिले. ऊस उत्पादकांना पंधरा दिवसांमध्ये पैैसे अदा करावेत, असेही बजावले. माजलगाव व आसपासच्या साखर कारखान्यांनी याची अंमलबजावणी केली नाही. साखर आयुक्तांनी संबंधित कारखान्याची मालमत्ता जप्त करा, असे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. एवढे करूनही शेतकºयांना न्याय मिळायला तयार नाही. दप्तर दिरंगाईमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. मराठवाड्यात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. दैैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतकरी कर्जाच्या खाईत आपोआप लोटला जात आहे. बँका, सावकार कर्ज वसुलीसाठी तगादा करीत आहेत. एकीकडे उसाचे पैैसे मिळेनात, तर दुसरीकडे कर्जावर व्याज वाढत आहे. उसाचे पैसे साखर कारखान्यांनी त्वरित द्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती भयावह आहे. तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. चाराटंचाईही आहे. अन्नधान्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. महागाईमुळे कष्टकºयांचे कंबरडे मोडले जात असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.