१६ कर्मचाºयांना बजावल्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:15 AM2017-09-26T00:15:29+5:302017-09-26T00:15:29+5:30
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष व क्षेत्रीय अधिकारी यांच्या बैठकीस तसेच निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास अनुपस्थित राहणाºया १६ कर्मचाºयांना तहसील प्रशासनाने २५ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष व क्षेत्रीय अधिकारी यांच्या बैठकीस तसेच निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास अनुपस्थित राहणाºया १६ कर्मचाºयांना तहसील प्रशासनाने २५ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
तालुक्यातील महातपुरी, शंकरवाडी, भांबरवाडी, बेलवाडी, घटांग्रा, नागठाणा, पिंपरी झोला, डोंगरजवळा, सिरसम से., रुमणा ज., चिलगरवाडी, इळेगाव व मसणेरवाडी या ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू आहे.
यासाठी नियुक्त कर्मचाºयांचे २३ सप्टेंबर रोजी प्रशिक्षण व ८ क्षेत्रीय अधिकाºयांची बैठक पार पडली. यावेळी १६ कर्मचारी, अधिकारी अनुपस्थित राहिले.
यामध्ये मुख्याधिकारी नानासाहेब कामटे, गटशिक्षणाधिकारी पारवेकर, माजलगाव कालवा विभागाचे शाखा अभियंता आर.बी. जाधव, प्रकाश ठुुले, सूर्यकांत कदम, एम.जी. ढाकणे, चंद्रशेखर गिरी, श्यामराव करंजे, रंगनाथ आचार्र्य, आबाजी पुटेवाड, उमाकांत नवरटे, सुरेंद्र शिसोदे, मोहन देशमुख, महेंद्र शिसोदे, परसराम कांबळे, एस.बी. वाघमारे आदींचा समावेश आहे.
हे कर्मचारी निवडणुकीच्या कामात सहकार्य करीत नसून निवडणूक कामाचे गांभीर्य लक्षात न घेता जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याप्रकरणी तहसीलदार आसाराम छडीदार, नायब तहसीलदार विजय दावनकर यांनी नोटिसा बजावल्या आहेत.