विकासकापाठोपाठ भूखंड खरेदीदारांनाही सिडकोने बजावल्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:08 PM2019-06-18T23:08:02+5:302019-06-18T23:08:27+5:30
सिडको अधिसूचित क्षेत्रात नियमबाह्य रेखांकन व बांधकाम करणाऱ्या विकासकापाठोपाठ भूखंड खरेदी करणाऱ्यांविरुद्धही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मोकळ्या भूखंडावर अनधिकृत रेखांकन केल्याप्रकरणी प्रशासनाने नुकत्याच ३३ जणांना नोटिसा बजावल्या आहेत.
वाळूज महानगर : सिडको अधिसूचित क्षेत्रात नियमबाह्य रेखांकन व बांधकाम करणाऱ्या विकासकापाठोपाठ भूखंड खरेदी करणाऱ्यांविरुद्धही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मोकळ्या भूखंडावर अनधिकृत रेखांकन केल्याप्रकरणी प्रशासनाने नुकत्याच ३३ जणांना नोटिसा बजावल्या आहेत.
सिडको वाळूज महानगर परिसरातील वडगाव कोल्हाटी, तीसगाव, साजापूर, शेकापूर, रांजणगाव, वाळूज आदी भागांत सिडको अधिसूचित क्षेत्रात सिडकोची परवानगी न घेता अनेकांनी भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. अनेक विकासकांनी ग्रामपंचायतीला हाताशी धरून लेआऊट टाकून प्लॉट विक्री केली जात आहे. विकासकाडून अनेकांनी मोकळे भूखंड खरेदी करून स्वप्नातील घर बांधण्यासाठी लेआऊट टाकले आहेत. यात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याने सिडको हद्दीत नियमबाह्य रेखांकन व बांधकाम करणाºया विकासकाविरुद्ध प्रशासनाने कारवाई सुरू केली असून, अनेक विकासकांविरुद्ध वाळूज, वाळूज एमआयडीसी व सातारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. अनेकांना नोटिसा बजावल्या आहेत. आता विकासकापाठोपाठ प्रशासनाने भूखंड खरेदी करणाºयांविरुद्धही कारवाई सुरू केली आहे. मोकळ्या भूखंडावर अनधिकृत रेखांकन करून भूखंड स्वत:च्या नावे करून सातबाºयाला नावे लावणाºया ३३ भूखंडधारकांना महाराष्ट्र प्रादेशिक आणि नियोजन अधिनियम १९६६ च्या कलम ५४ नुसार नोटिसा बजावल्या आहेत. सिडकोच्या या कारवाईमुळे भूखंडधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
यांना बजावल्या नोटिसा...
सिडको अधिसूचित क्षेत्रात मोकळ्या भूखंडावर अनधिकृत रेखांकन करून, तसेच भूखंड आपल्या नावे करून सातबाºयाला नावे लावणाºया सुमित्रा देशपांडे, मंदाकिनी मुराळकर, मंजूश्री बनसोडे, श्रीधर फेस्टे, जोत्स्ना टापर, प्रदीप टापर, विजया बारवाल, दुर्गादास पिसोळकर, सुरेश देशपांडे, ओमप्रकाश चांडक, रामराव रोडे, प्रमिला तोडकरी, दयानंद विभुते, गिरीश जोशी, सुभाष रोडे, सुजाता जैस्वाल, अनुपमा गायकवाड, अनुपमा कमलाकर गायकवाड, शैलेजा पांढरे, गोविंदराव सूर्यवंशी, किरण बोडखे, सर्फराज खान, मोईन सिद्दीकी, गंगाधर चलवदे, अनिल सोनवणे, सु.ल. जाधव, रुकसन फकरे, स्वरूपा साखरे, देवेंद्र खिडाकर, राकेश दुग्गल, प्रवीण सासवडे यांना नोटिसा बजावल्याचे सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांनी सांगितले.