हलगी वाजवून थकबाकीदारांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 11:55 PM2017-03-24T23:55:50+5:302017-03-24T23:57:11+5:30

तुळजापूर : मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी वाजवून पालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत़

Notices to the trumpsters by rolling them | हलगी वाजवून थकबाकीदारांना नोटिसा

हलगी वाजवून थकबाकीदारांना नोटिसा

googlenewsNext

तुळजापूर : मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी वाजवून पालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत़ मुदतीत कराचा भरणा न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे़
तुळजापूर नगर पालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार कराचा भरणा करण्यासाठी सूचना, नोटिसा दिल्या आहेत़ तसेच चौका-चौकांत डिजिटल बोर्ड लावून जनजागृती केली आहे़ मात्र, तरीही कराचा भरणा अनेकांनी केलेला नाही़ त्यामुळे नगर पालिकेच्या पथकाने शुक्रवारी सकाळीच हलग्या घेऊन थकबाकीदारांचे घर गाठण्यास सुरूवात केली़ शहरातील आंबेडकर चौक, दीपक चौक, नेपते गल्ली, भोसले गल्ली, जवाहर गल्ली, साळुंके गल्ली, महाद्वारे रोड, आर्य चौक, कमान वेस, मंगळवार पेठ या भागातील थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी वाजवून नोटिसा देण्यात आल्या आहेत़ मालमत्ता कर थकबाकीदारांनी तात्काळ करभरणा करावा, होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन वसुली प्रमुख भारत साळुंके यांनी केले़
या मोहिमेत नगर अभियंता अशोक सनगले, कर्मचारी ज्ञानोबा टिंगरे, संतोष शेटे, संतोष इंगळे, बाळासाहेब जाधव, नेताजी भोसले, रवि मस्के, दत्ता डोंगरे, शिवाजी सोनवणे, विशाल अमृतराव, सज्जन गायकवाड, नागेश काळे या कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Notices to the trumpsters by rolling them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.