कुख्यात गुन्हेगार जम्याचा चाकूने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:05 AM2021-06-05T04:05:36+5:302021-06-05T04:05:36+5:30

औरंगाबाद: पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जमील खान उर्फ जम्या शब्बीर खान (३०, किराडपुरा) याचा चाकूने भोसकून त्याच्या नातेवाइकानेच (साडूभावाने) खून ...

Notorious criminal stabbed to death | कुख्यात गुन्हेगार जम्याचा चाकूने भोसकून खून

कुख्यात गुन्हेगार जम्याचा चाकूने भोसकून खून

googlenewsNext

औरंगाबाद: पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जमील खान उर्फ जम्या शब्बीर खान (३०, किराडपुरा) याचा चाकूने भोसकून त्याच्या नातेवाइकानेच (साडूभावाने) खून केला. ही घटना शाहगंज येथील जुन्या मॉडर्न हॉटेलच्या समोर शुक्रवारी रात्री झाली. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्राप्त माहितीनुसार, मयत जम्या उर्फ जमील खान हा किराडपुरा येथील रहिवासी आहे. मात्र, तो शाहगंज येथेच मजुरी करायचा. त्याच्यावर घरफोडी आणि चोरीचे सात ते आठ गुन्हे नोंद आहेत. यामुळे तो सिटीचौक ठाण्याच्या रेकॉर्डवर होता. शुक्रवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास शाहागंज येथील चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाळेसमोरील जुन्या मॉर्डर्न हॉटेलचे बांधकाम सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या गॅलरीत जम्या आणि त्याचा नातलग असलेल्या तरुणाचा वाद झाला. यावेळी त्याने जम्याच्या छातीवर पोटावर आणि मांडीत चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जमील खानला बाबाखान आणि अन्य लोकांनी रिक्षातून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी जम्याला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच, एसीपी विवेक सराफ, सिटीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक खटाने, फौजदार वंदना मुळे, भगवान मुजमुले आणि अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

चौकट...

गुन्हे शोधपथक आरोपीच्या मागावर

जम्याचा खून त्याच्या नातेवाइकाने केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली. पळून गेलेला खुनी जम्याचा नातेवाईक

किराडपुरा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांना कळाले. त्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

Web Title: Notorious criminal stabbed to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.