कोरोना तपासणीनंतर आता २५ तास होम क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:06 AM2021-02-23T04:06:30+5:302021-02-23T04:06:30+5:30
शहरात कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून २ लाख ५० हजार अँटिजेन तर १ लाख ५० हजार आरटीपीसीआर पद्धतीच्या चाचण्या ...
शहरात कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून २ लाख ५० हजार अँटिजेन तर १ लाख ५० हजार आरटीपीसीआर पद्धतीच्या चाचण्या केल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी महापालिकेने केलेल्या तयारीसंदर्भात डॉ. पाडळकर यांनी सांगितले की, पुन्हा किलेअर्क व एमजीएम स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथील कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. त्यासोबतच ज्या कोविड सेंटरच्या जागा महापालिकेने परत केल्या आहेत. त्यांनादेखील पुन्हा पत्र दिले जाणार आहे. सुमारे ३०० कर्मचारी अद्याप कार्यरत आहेत. ३९ हजार अँटिजेन तर ११ हजार आरटीपीसीआर किट महापालिकेकडे उपलब्ध आहेत. गरज पडल्यास शासनाकडून किट प्राप्त होतील. मंगल कार्यालयांसह, सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी ५० च्या वर गर्दी असू नये, असा नियम असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याची सूचना केली आहे.
---------
रेमडेसिवीर इंजेक्शन
घाटी रुग्णालयातून घेणार
महापालिकेकडे सध्या ५० रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत. घाटी रुग्णालयातून आणखी एक हजार इंजेक्शन मागविले जाणार आहेत. अतिगंभीर रुग्णांसाठी रेडिमिसिवीर इंजेक्शनची गरज आहे.