...आता खाजगी होर्डिंगवर औरंगाबाद मनपा पथकाचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:36 AM2018-09-06T00:36:22+5:302018-09-06T00:36:46+5:30

विनापरवानगी चौकाचौकात होर्डिंग लावणाऱ्यांची संख्या बरीच कमी झाली असली तरी खाजगी कंपन्यांनी स्पर्धेमुळे प्रचंड जाहिरातबाजी सुरू केली आहे. या अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्सवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. मागील चार दिवसांमध्ये मनपाने तब्बल ५ हजार ५०४ होर्डिंग काढले. बुधवारी महापालिकेच्या नऊ वेगवेगळ्या पथकांनी खाजगी जाहिरातींवर सर्वाधिक भर देत १३१५ होर्डिंग काढले.

... now attacking the Aurangabad Municipal Squad on private hoarding | ...आता खाजगी होर्डिंगवर औरंगाबाद मनपा पथकाचा हल्लाबोल

...आता खाजगी होर्डिंगवर औरंगाबाद मनपा पथकाचा हल्लाबोल

googlenewsNext
ठळक मुद्देचौथ्या दिवशीही कारवाई : चार दिवसांत साडेपाच हजार होर्डिंग काढले

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विनापरवानगी चौकाचौकात होर्डिंग लावणाऱ्यांची संख्या बरीच कमी झाली असली तरी खाजगी कंपन्यांनी स्पर्धेमुळे प्रचंड जाहिरातबाजी सुरू केली आहे. या अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्सवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. मागील चार दिवसांमध्ये मनपाने तब्बल ५ हजार ५०४ होर्डिंग काढले. बुधवारी महापालिकेच्या नऊ वेगवेगळ्या पथकांनी खाजगी जाहिरातींवर सर्वाधिक भर देत १३१५ होर्डिंग काढले.
खंडपीठाच्या आदेशानुसार महापालिकेने मागील महिन्यात पोलिसांच्या सहकार्याने तब्बल ८ हजार अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स काढले होते. यामध्ये सर्वाधिक होर्डिंग राजकीय मंडळींनी लावलेले होते. या कारवाईनंतर महापालिकेने अनधिकृत होर्डिंग लावणाºया सहा जणांवर गुन्हेसुद्धा दाखल केले. खाजगी कंपन्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला नव्हता. स्पर्धेमुळे खाजगी कंपन्यांनी जिथे जागा मिळेल तेथे जाहिरात फलक लावले होते. अनेक व्यापाºयांनी दुकानासमोरच मोठमोठे फलक लावले होते. बुधवारी महापालिकेच्या सर्व नऊ पथकांनी सर्वाधिक होर्डिंग खाजगी कंपन्यांचेच काढले. दिवसभरात १३१५ होर्डिंग काढण्यात आल्याचे मनपातर्फे कळविण्यात आले. यापुढे अनधिकृतपणे जाहिरात फलक, होर्डिंग दिसून आल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले.

Web Title: ... now attacking the Aurangabad Municipal Squad on private hoarding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.