आता शहराची मोठी जलवाहिनी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:09 AM2017-08-22T01:09:58+5:302017-08-22T01:09:58+5:30
रविवारी रात्री पैठण रोडवर अजित सीडस् येथे १२०० मि. मी. व्यासाची मोठी जलवाहिनी फुटली. युद्धपातळीवर महापालिकेने दुरुस्तीचे काम सुरू केले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शनिवारी आणि रविवारी जायकवाडी येथे तब्बल दहा वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा अगोदरच विस्कळीत झाला आहे. त्यातच रविवारी रात्री पैठण रोडवर अजित सीडस् येथे १२०० मि. मी. व्यासाची मोठी जलवाहिनी फुटली. युद्धपातळीवर महापालिकेने दुरुस्तीचे काम सुरू केले असून, सोमवारी मध्यरात्री दुरुस्तीचे काम संपणार आहे. त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.
शनिवारी जायकवाडी पाणीपुरवठा केंद्रात दहा वेळा वीजपुरवठा खंडित झाली. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता. रविवारी सायंकाळी विजेचे सर्व दोष दूर करून महापालिकेने सायंकाळी ५ वाजेपासून शहरात पाणी आणणे सुरू केले. शहरात थोडेफार पाणी आले असताना रात्री १० वाजेच्या सुमारास पैठण रोडवर अजित सीडस् येथे १२०० मि. मी. (पान २ वर)