लासूर स्टेशनवर आता तिस-या डोळ्याची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:53 PM2018-01-11T23:53:29+5:302018-01-11T23:53:37+5:30
गेल्या काही महिन्यांत घडलेल्या खून प्रकरणाचा व चोºयांचा तपास लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्ते व चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लासूर स्टेशन : गेल्या काही महिन्यांत घडलेल्या खून प्रकरणाचा व चो-यांचा तपास लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्ते व चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
तीस हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या लासूर स्टेशन येथील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न काही महिन्यांपासून चव्हाट्यावर आला होता. मुथा यांचे लुट प्रकरण, त्यानंतर पाटणी व जाजू खून प्रकरण, तसेच येथे झालेल्या चोºया यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याची दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्य रस्ते व चौकात १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे चोरटे व समाजकंटकांच्या कारवाया थांबतील, असा विश्वास सरपंच रश्मी जैस्वाल यांनी व्यक्त केला. येथील डोणगाव रोड, अनंत दिघे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बसस्थानक, सावंगी चौकासह मुख्य ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत, अशी माहिती ग्रा.पं. सदस्य सुरेश जाधव यांनी दिली.
दरम्यान, वाळू लिलाव बंद असल्याने, चोरट्या मार्गाने रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू असलेली वाळू वाहतूक सीसीटीव्ही कॅमेºयात कैद होणार असल्याने वाळूतस्करांची गोची होणार आहे.