आता चातुर्मासात करा बिनधान्स लग्न; पंचांगकर्त्यांनी दिल्या आपत्कालीन ३७ लग्नतिथी

By प्रशांत तेलवाडकर | Published: March 22, 2023 03:22 PM2023-03-22T15:22:01+5:302023-03-22T15:22:59+5:30

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांसाठी आनंदाची बातमी

Now get married in Chaturmas; Emergency 37 marriage dates given by panchangakarte | आता चातुर्मासात करा बिनधान्स लग्न; पंचांगकर्त्यांनी दिल्या आपत्कालीन ३७ लग्नतिथी

आता चातुर्मासात करा बिनधान्स लग्न; पंचांगकर्त्यांनी दिल्या आपत्कालीन ३७ लग्नतिथी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या नवरदेव-नवरीसाठी पंचांगकर्त्यांनी आता आनंदाची बातमी दिली आहे. अहो, यंदा लग्नतिथी कमी असली, तरी चिंता करू नका... कारण अधिकमास-चातुर्मास काळातही तुम्हाला लग्न करता येणार आहे. त्यासाठी दिवाळीनंतर तुळशीच्या विवाहाची वाट पाहावी लागणार नाही. एप्रिल ते नोव्हेंबरच्या दरम्यान आपत्कालीन ३७ लग्नतिथी देण्यात आल्या आहेत. मग उडू द्या लग्नाचा बार...

मुख्य काळातील लग्नतिथी :
मे २०२३ :- २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२,२९, २९, ३०.
जून :- १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २६, २७. २८.
डिसेंबर :- ६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, २६, ३१.
--------------------------------
गौणकाल व आपत्कालीन लग्न मुहूर्त
एप्रिल - १५, २३, २४, २९, ३०.
जून - ३०,
जुलै - १, २, ४, ५, ९, १०, ११, १४.
ऑगस्ट - २२, २६, २८,२९.
सप्टेंबर - ३, ६, ७, ८, १७, २४, २६.
ऑक्टोबर - १६, २०, २२. २३, २४, २६.
नोव्हेंबर - १, ६, १६, १८, २०,२२.
--------------------------------
अधिक मास - १८ जुलै ते १६ ऑगस्ट
चातुर्मास : २९ जून ते २३ नोव्हेंबर

राज्यातील पंचांगकर्त्यांचे एकमत
पूर्वी चातुर्मासात (पर्जन्यकाळात) काळात घरासमोर मांडवात विवाह करीत असल्याने आणि प्रवासाची साधने नसल्याने लग्न मुहूर्त दिले जात नव्हते. मात्र, महाराष्ट्र वगळता अन्य राज्यात मागील ६० ते ७० वर्षापासून पंचागकर्ते चातुर्मासात लग्नमुहूर्त देत आहे. आता मंगल कार्यालयात लग्न लावले जातात व प्रवासही सुखकर झाल्याने महाराष्ट्रातही चातुर्मास काळात लग्नतिथी देण्यात याव्यात यावर राज्यातील सर्व पंचांगकर्त्यांची १८ फेब्रुवारी २०१९ बैठकीत एकमत झाले. त्यानंतर पंचांगात मुख्यकालातील लग्नमुहूर्त सोबतच गौणकाल/चातुर्मासतील मुहूर्त व आवश्यकता असल्यास गुरु किंवा शुक्र यांच्या अस्तकालातील लग्नमुहूर्त पंचांगात देणे सुरु झाले.

आपत्कालीन लग्न मुहूर्त कोणासाठी
चातुर्मासात आपत्कालीन लग्न मुहूर्त देण्यात आले आहेत. ज्यांचे आधीच लग्न ठरले आहे किंवा साखरपुडा झाला आहे, घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती आजारी आहे, त्यांच्या डोळ्यासमोर लग्न लावायचे आहे किंवा कोणाची नोकरी विदेशात आहे. त्यांना दिवाळीनंतर सुट्ट्या मिळत नाहीत, अशांनी आपत्कालात लग्न करावे, तसेच मुख्य काळात ज्यांना मंगल कार्यालय उपलब्ध झाले नाही. काही अडचण आली, त्यांनी आपत्कालात लग्न करावे. चातुर्मासात लग्न उद्योगात काम नसते. त्यांनाही आपत्कालीन लग्न तिथीमुळे काम मिळेल.
- वेदमूर्ती सुरेश केदारे गुरुजी.

Web Title: Now get married in Chaturmas; Emergency 37 marriage dates given by panchangakarte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.