आता अवैध पाणी उपसा रोखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:04 AM2017-11-16T00:04:19+5:302017-11-16T00:04:26+5:30
जिल्ह्यातील सिंचन विभागाच्या तलावातून रात्री अपरात्री पाणी उपसासर्रासपणे सुरु आहे. त्यामुळे तलावाची पाणी पातळी खालावत असल्याने आता सिंचन विभाग जागा झाला असून, त्या- त्या भागातील संबंधिताना नोटीसा बजावल्या आहेत. अवैध उपसा करणारे साहित्यही जप्त केले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील सिंचन विभागाच्या तलावातून रात्री अपरात्री पाणी उपसासर्रासपणे सुरु आहे. त्यामुळे तलावाची पाणी पातळी खालावत असल्याने आता सिंचन विभाग जागा झाला असून, त्या- त्या भागातील संबंधिताना नोटीसा बजावल्या आहेत. अवैध उपसा करणारे साहित्यही जप्त केले जाणार आहेत.
दरवर्षी सिंचन विभागाच्या तलावातून पाणी उपसा करण्याचा सपाटा लावल्याने, उन्हाळ्यापुर्वीच तलाव कोरडे पडण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर्षी मात्र सिंचन विभागाच्यावतीने खबरदारी घेऊन पाणी उपसा थांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पाणी उपसा होणाºया तलावातील शेतकºयांना सुचना देऊन त्या- त्या भागातील ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, विद्यूत वितरण कंपनीच्या अभियंत्यास नोटीसाद्वारे कळविण्यात आले आहे. तर सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील लघु सिंचन परिसरात असलेल्या रोहित्राचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. तर वाघजाळी, सुलदली बु, भानखेडा, ब्राम्हणवाडा आणि हिंगोली तालुक्यातील हिरडी या भागातही पाणीउपसा सुरु असल्याचे समोर आल्याने तिकडेही लक्ष देण्यात येणार असून, तेथील विद्युतपंप जप्त केले जाणार आहेत. भविष्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी पाणी उपसा थांबविण्याचे आवाहन जलसिंन विभागाने केले आहे. नोटिसीद्वारे कळवूनही जर काहीच परिणाम होत नसेल तर तलावातून उपसा करणारी साहित्य जप्त करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी बी. आर. शिवकुमार (सिंचन विभाग) यांनी सांगितले.