आता ९१ लाखाऐवजी ९८ लाखांचा निधी मिळणार
By Admin | Published: August 10, 2014 11:57 PM2014-08-10T23:57:55+5:302014-08-11T00:03:39+5:30
जालना: भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथील पाणीपुरवठा योजनेसाठी तयार केलेल्या ढोबळ अंदाज पत्रकास शासनाने प्रशासकीस मान्यता दिली आहे.
जालना: भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथील पाणीपुरवठा योजनेसाठी तयार केलेल्या ढोबळ अंदाज पत्रकास शासनाने प्रशासकीस मान्यता दिली आहे. दरम्यान यापूर्वी ९१ लाख ८३ हजार ३०० रूपयाची मान्यता देण्यात आली होती. आता त्यात वाढ करून ९८ लाख ८६ हजार दोनशे रूपयाच्या अंदाज पत्रकास मान्यता देण्यात आली आहे.
भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथील पाणी प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने २६ जानेवारी २०१२ रोजी ठराव घेवून पाणीपुरवठा योजनेबाबत प्रस्ताव दाखल केला होता. दरडोई खर्च वाढल्यामुळे जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला होता.
दोन वर्षानंतर म्हणजे २५ जुलै रोजी शासनाने एका निर्णयानुसार या प्रस्तावास मान्यता दिली होती. त्यावेळी वाढीव दरडोई खर्च ३४२४ असल्याने शासनाने ९१ लाख ८३ हजार ३०० रूपयाच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता दिली होती.
आता ६ आॅगस्ट २०१४ रोजी शुद्धी पत्रक काढून ९१ लाखा ऐवजी ९८ लाख ८६ हजार २०० रूपयाच्या ढोबळ अंदाजपत्रकास मान्यता दिली. (प्रतिनिधी)
ग्रामसभेत माहिती देण्याची सूचना
शासनाने योजनेचे काम सुरू करण्या संदर्भात १२ सूचना केल्या आहेत. त्यात लोकवर्गणी भरणे बाबत ठराव घेणे, देखभाल दुरूस्तीच्या खर्चासाठी पाणी पट्टीचे दर प्रती घर कमीत कमी ९०० रूपये आकारणे, योजनेमार्फत १०० टक्के घरगुती नळजोडणीचा समावेश करण्यात यावा, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेवून योजनेची माहिती स्पष्टपणे द्यावी आदी मुद्यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना
बाभूळगावाला मंजूर झालेल्या या योजनेवरील खर्च जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजेल कार्यक्रमातंर्गत केंद्र तथा राज्य शासनाच्या निधीतून भागविण्यात येणार आहे. योजनेस आता पूर्वी मंजूर केलेल्या ९१ लाख ८३ हजार रूपया ऐवजी ९८ लाख ८६ हजार २०० रूपयाचा निधी मिळणार आहे. निधीत वाढ झाल्याने योजनेचे काम तात्काळ हाती घेवून मार्गी लावावे अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहे.