अंगणवाडी कर्मचाºयांचे आता जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:52 PM2017-10-04T23:52:19+5:302017-10-04T23:52:19+5:30
अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागील २४ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आता जेलभरो आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागील २४ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आता जेलभरो आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली़
अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांची स्थिती बिकट झाली आहे़ जिल्ह्यातील बहुतांश उघड्यावर भरणाºया अंगणवाड्यांमध्ये शिकविण्यासाठी अंगणवाडीताई नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़
जिल्ह्यात ठिकठिकाणी ६०० अंगणवाड्यांसाठी ६ लाख रूपये खर्चून स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येणार असले तरी बांधकामांना सुरूवात झाली नाही़ त्यामुळे अनेक ठिकाणी अंगणवाड्या उघड्यावर, देवालय, समाजमंदिर, खाजगी इमारतीत भरविल्या जातात़ त्यातच अंगणवाडी कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे नवीन प्रश्नाची भर पडली आहे़
पायाभूत शिक्षण दर्जेदार देण्यासाठी अंगणवाड्यांचे स्वरूप बदलण्याच्या घोषणा होतात, परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही़ आजही वस्ती, वाडे, तांडे, ग्रामीण भागात गोरगरिबांची मुले उघड्यावर अक्षरे गिरवताना दिसत आहेत़
काही गावांत समाजमंदिर, मंदिरात या अंगणवाड्या भरविण्यात येत आहेत़ तसेच काही ठिकाणी खाजगी इमारत भाड्याने घेवून अंगणवाड्या चालविण्यात येत आहेत, परंतु या खाजगी इमारतीचे भाडे अनेक महिन्यांपासून रखडले आहे़ त्यामुळे अंगणवाड्यांची स्थिती नाजूक झाली आहे़ दरम्यान, संपामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ वेळेवर पुरक आहार मिळत नसल्याने राज्यातील बालके दगावत आहेत़ यासंदर्भात कृती समितीचे जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाले, संपाचा पुढील टप्पा म्हणून परभणी येथे गुरूवारी जेलभरो अांदोलन करण्यात येत आहे़ याच दिवशी मुंबईत मुख्यमंत्री आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत़ त्यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे़ अन्यथा आंदोलन यापुढेही सुरुच ठेवण्यात येईल़
अंगणवाडीतील बालकांना पुरविण्यात येणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी पर्यायी आहार देण्याची मागणी केली आहे़ महाराष्ट्र राज्यात विशेषत: आदिवासी विभागात बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत सहा महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना टीएचआर दिला जातो. तो अत्यंत निकृष्ट असतो.