आता शेवटची संधी ! गुंठेवारी योजनेला ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 05:43 PM2022-01-01T17:43:51+5:302022-01-01T17:44:11+5:30

या उपक्रमाला आणखी महिनाभराची मुदतवाढ देण्याची सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती.

Now one last chance! Gunthewari scheme extended till January 30 | आता शेवटची संधी ! गुंठेवारी योजनेला ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

आता शेवटची संधी ! गुंठेवारी योजनेला ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

googlenewsNext

औरंगाबाद : शासन आदेशानुसार महापालिकेने गुंठेवारी योजनेला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ४ हजार मालमत्ताधारकांनी नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर केले. त्यापैकी २ हजार ३७ संचिका मंजूर करण्यात आल्या. या उपक्रमाला आणखी महिनाभराची मुदतवाढ देण्याची सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली. त्यानुसार मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गुंठेवारीला ३० जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा केली. ३७३ व्यावसायिक मालमत्ताधारकांना शेवटची मुदतवाढ असेल, असेही पाण्डेय यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकारने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी गुंठेवारी कायद्याला मंजुरी दिली. महापालिकेने गुंठेवारी नियमितीकरणासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना केली. नागरिकांच्या मदतीसाठी ५१ वास्तुविशारदांचे पॅनल तयार केले. शहरातील १५०० चौरस फूट क्षेत्रातील मालमत्ता नियमित करण्यासाठी रेडीरेकनरच्या ५० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. सप्टेंबरपासून संचिका दाखल होण्यास सुरुवात झाली. 

गुंठेवारी योजनेत मागील चार महिन्यांत ४ हजार २१४ संचिका दाखल झाल्या असून २ हजार ३७ संचिका मंजूर करण्यात आल्या आहेत. गुंठेवारीला ३० जानेवारी २०२२ पर्यंत वाढ देण्यात येत असल्याचे पाण्डेय यांनी जाहीर केले. गुंठेवारीतील संचिका वास्तुविशारदांकडे पडून असल्याचे पाण्डेय यांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले की, याबद्दलचा आढावा घेतला जाईल. वास्तुविशारदांना संचिका तयार करताना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Now one last chance! Gunthewari scheme extended till January 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.