आता आंध्रात पाटोदा पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2016 12:49 AM2016-04-22T00:49:23+5:302016-04-22T00:52:49+5:30

वाळूज महानगर : आंध्र प्रदेश विधानसभेच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा गावाला भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली.

Now Patna Patrol in Andhra | आता आंध्रात पाटोदा पॅटर्न

आता आंध्रात पाटोदा पॅटर्न

googlenewsNext

वाळूज महानगर : आंध्र प्रदेश विधानसभेच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा गावाला भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. या गावाने राबविलेले विविध उपक्रम आंध्र प्रदेशात राबविण्याचा निर्धार या मंडळाने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राचे रोल मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटोदा गावाला आंध्र प्रदेश शिष्टमंडळाने विविध विकासकामांची पाहणी केली. पाटोदा गावात लोकसहभागातून विविध कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहे. गावातील ग्रामपंचायतीचा संगणकीकृत कारभार, वीज बचतीसाठी सौर ऊर्जेचा वापर, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी घरासमोर एक झाड, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कॅरिबॅग वापरावर बंदी, गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे व व्यसनापासून ग्रामस्थांनी दूर राहावे, यासाठी गुटखा व दारूविक्रीवर बंदी, संपूर्ण ड्रेनेजलाईन व गावातील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, आगाऊ कर भरणाऱ्या नागरिकांना मोफत संसारोपयोगी साहित्याची भेट, संपूर्ण कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना मोफत दळण, गावात सिमेंट व पेव्हर ब्लॉकचे रस्ते, महिला, पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह, कचरा साठवण्यासाठी डस्टबिन, गरोदर मातांसाठी मदर केअर सेंटर, शालेय विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार, घराच्या मालकी हक्कात पती-पत्नीची नावे, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, आयएसओ मानांकनप्राप्त जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या, एटीएम कार्डद्वारे नाममात्र दरात शुद्ध पाणीपुरवठा तसेच ग्रामपंचायतीद्वारे गावातील सर्व कुटुंबियांना २० लिटर शुद्ध पाणी आदी सुविधा पुरविण्यात येत आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर, नागरिकांना संगणकीकृत प्रमाणपत्राचे वाटप, मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत, जातीय सलोखा, धार्मिक, सामाजिक उपक्रमात ग्रामस्थांचा सहभाग, गावाच्या विकासासाठी एकजूट दाखविणारे नागरिक आदींमुळे पथकातील सदस्यही अचंबित झाले होते.
पाटोदाने राबविलेले विविध कल्याणकारी उपक्रम आंध्र प्रदेशात राबविण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष डॉ. कोडेलासिवा प्रसादराव व आमदारांनी व्यक्त केले. पादोटा गावचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आंध्र प्रदेशातील ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे पथकातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या पथकात महिला व बालकल्याणमंत्री किमिडी मृणालिनी, आ. कगिंथा व्यंकटराव, आ.येलुरी संबा सिवाराव, आ. जयनागेश्वर रेड्डी, डी.ए.सत्यप्रभा, गता मसला, अन्नाम सतीश प्रभाकर, गी श्रीनिवासुलू, डॉ. एम.गेयानंर, पमेंटसा विष्णुकुमार, मथुमुला रेड्डी, विधानसभा सचिव के.गुरुमूर्ती, जनसंपर्क अधिकारी बोपन्ना रविकुमार आदींचा समावेश होता. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कदम, शिक्षणाधिकारी छायादेवी कवडदेव, विस्तार अधिकारी एस.डी.साळुंके, स्वच्छ भारत अभियानचे राज्य समन्यवक तथा माजी सरपंच भास्करराव पा.पेरे, सरपंच कल्याण पेरे, उपसरपंच विष्णू राऊत, ग्रामविकास अधिकारी आर.डी.चौधरी, अंगणवाडी पर्यवेक्षिका मनीषा कदम आदींनी गावात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती पथकातील सदस्यांना दिली. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य चंदनसिंग मेहर, किशोर पेरे, जनार्दन भाग्यवंत, लहू मुचक, अण्णासाहेब पेरे, जगन्नाथ पेरे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Web Title: Now Patna Patrol in Andhra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.