आता झाली आठवण नेत्यांना शिवसैनिकांची

By Admin | Published: September 29, 2014 12:55 AM2014-09-29T00:55:56+5:302014-09-29T01:00:07+5:30

औरंगाबाद : शिवसेना-भाजपा महायुती तुटताच नेत्यांना विशेष करून उमेदवारांना शिवसैनिक, त्यांचे कॅडर आठवू लागले आहे.

Now reminded the leaders of the Shiv Sainiks | आता झाली आठवण नेत्यांना शिवसैनिकांची

आता झाली आठवण नेत्यांना शिवसैनिकांची

googlenewsNext

औरंगाबाद : शिवसेना-भाजपा महायुती तुटताच नेत्यांना विशेष करून उमेदवारांना शिवसैनिक, त्यांचे कॅडर आठवू लागले आहे. गटप्रमुखांपासून वरील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना विनवण्या करून प्रचारात आघाडी घ्या, असा सूर आज शिवसेना, भाजपाच्या जिल्हा मध्यवर्ती प्रचार कार्यालयांत नेत्यांनी, उमेदवारांनी आळवला.
कुणाचे नाव पॉम्पलेट, होर्डिंग्जवर नसेल, कुणाला उमेदवाराने फोन केला नाही, तर रुसून बसू नका. उमेदवारांनो कार्यकर्त्यांना रागावू नका, उमेदवारांबाबत कुठेही अपप्रचार करू नका. यासारख्या अनेक टिप्सही यावेळी देण्यात आल्या. उपनेते खा.चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत आज जिल्ह्यातील सर्व विधानसभा उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आले. शालजोडे, चिमटे आणि विनोदी भाषणांमुळे कार्यालयात संदिग्ध वातावरण निर्माण झाले होते.
कालपर्यंत युतीमध्ये निवडणुका लढल्या जात असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना कार्यकर्त्यांची गरजही दुय्यम वाटत असे. मात्र, आता स्वबळावर निवडणूक मैदानात उतरण्याची वेळ आल्यामुळे सर्वांना कार्यकर्ते, कुटुंब, विश्वास या गोष्टी आठवू लागल्या आहेत.
मतदारांना बाहेर काढणारी यंत्रणा आता कोलमडली आहे. ती घट्ट करण्यासाठीच कार्यकर्ते हवे असल्याचे शिवसेनेच्या जवळपास सर्वच उमेदवारांच्या लक्षात आल्यामुळे सर्वांनी कार्यकर्त्यांना काम करण्याचे आवाहन केले.
महापालिकेच्या निवडणुका पुढे आहेत. जे शिवसेनेचे काम करणार नाहीत, त्यांच्यावर पक्षाची पाळत असणारच आहे. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना उमेदवारी मिळणार नाही, असा दमही मेळाव्यात सर्व उमेदवारांनी भावी इच्छुकांना दिला.

Web Title: Now reminded the leaders of the Shiv Sainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.