आता विद्यापीठात सोमवारपासून लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:06 AM2021-06-09T04:06:07+5:302021-06-09T04:06:07+5:30
विद्यापीठात कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार, आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्याची सूचना कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी केली होती. विद्यापीठ परिसरातील ...
विद्यापीठात कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार, आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्याची सूचना कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी केली होती. विद्यापीठ परिसरातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सुरक्षा रक्षक आदी ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांसाठी विद्यापीठातील आरोग्य केंद्रात येत्या सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. दररोज सुमारे १०० कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. लस घेऊ इच्छिणारांना १२ जूनपर्यंत आरोग्य केंद्रात जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठाचे ओळखपत्र व आधार कार्ड लसीकरणाच्या दिवशी सोबत आणणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर, दिलेल्या तारखेला आरोग्य केंद्र येथे लसीकरण केले जाणार आहे, असे आवाहन कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी व वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद सोमवंशी यांनी केले आहे.
दरम्यान, कर्मचारी संघटनेची मागणी मान्य झाल्याबद्दल राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर व पर्वत कासुरे यांनी विद्यापीठ व मनपा प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.