...आता सिमेंट रस्त्यांची तोडफोड; सातारा- देवळाईकरांना आठवू लागल्या जुन्या आठवणी
By साहेबराव हिवराळे | Published: April 18, 2024 05:33 PM2024-04-18T17:33:16+5:302024-04-18T17:33:38+5:30
एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच मराठवाड्याचा ‘टँकर’वाडा होऊ लागला आहे.
छत्रपती संभाजीनगर : सातारा-देवळाई परिसरात रस्ते आताच कुठे धूळ व खड्डेमुक्त बनले आहेत. परंतु, सिमेंटच्या गुळगुळीत रस्त्यावर पिण्याच्या पाईपलाईन व ड्रेनेज लाइनमुळे ब्रेकर लावून खोदकाम करून पाइप टाकल्यावर ते सुस्थितीत न बुजविता ओबडधोबडपणे खड्डे सोडून निघून जातात. ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंट रस्ते तोडण्याचे काम सुरू आहे. ठेकेदारांनी ते खड्डे व्यवस्थित बुजवावेत असे कळविलेले असताना त्याकडे ठेकेदार लक्ष देत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे.
विकास करा हो..पण मागे वळून तर बघा...
विकास करा, यासाठी कुणाचाही विरोध असण्याचे काहीच कारण नाही. परंतु, नागरिकांचाही विचार करावा. पाइपलाइन टाकली त्यावर पेव्हर ब्लॉक बसवून तो रस्ता सुरळीत करण्याची गरज आहे.
- अनंत सोन्नेकर, रहिवासी
एक तर चिखलातून जावे लागत होते..
सध्या रस्ते चांगले झाले असले तरी ते खोदण्यात येत असून, रहिवाशांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सिमेंटच्या रस्त्याला खोदून त्या रस्त्याची वाट लावली जात आहे. सातारा- देवळाईचा विकास झाला की विद्रूपीकरण केले जात आहे, असा प्रश्न पडतो.
- अशोक तिनगोटे, रहिवासी