नृसिंह सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध

By Admin | Published: February 17, 2016 11:37 PM2016-02-17T23:37:35+5:302016-02-17T23:45:55+5:30

मुखेड : देगलूर तालुक्यातील खानापूर येथील नृसिंह सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाची निवडणूक १५ रोजी तडजोडीनंतर बिनविरोध पार पडली़

Nrusinh Sutagiri election uncontested | नृसिंह सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध

नृसिंह सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध

googlenewsNext

मुखेड : देगलूर तालुक्यातील खानापूर येथील नृसिंह सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाची निवडणूक १५ रोजी तडजोडीनंतर बिनविरोध पार पडली़ यात भाजपाचे नेते माजी खा़ भास्करराव पाटील खतगावकर यांच्या गटाचे १२ तर काँग्रेसच्या गटाचे ७ उमेदवार बिनविरोध काढण्यात आले़ ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कर्मवीर कलेटवाड यांनी सांगितले़
नृसिंह सूतगिरणीची निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती़ काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी या निवडणुकीकडे लक्ष दिल्याने निवडणूक अटीतटीची होणार अशी चित्रे दिसून येत होती़ पण १५ रोजी दोन्हीही गटाचे प्रमुख एकत्र बसून निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला व तडजोडीअंती काँग्रेसचे ७ उमेदवार घेण्याचे भाजपाने मान्य केले़ नृसिंह सूतगिरणीच्या एकूण १९ जागापैकी सूतगिरणीचे संस्थापक माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर, बापूराव सटवाजी शिंदे व एकनाथ तुळशीराम पाटील हे यापूर्वीच बिनविरोध निघाले होते़ पण खतगावकरांच्या निवडीला मोहन पाटील धुप्पेकर यांनी आव्हान देत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ धुप्पेकर यांची याचिका फेटाळत खतगावकरांचा उमेदवारी अर्ज १५ रोजी सोमवारी वैध ठरविला़ त्यानंतर निवडणूक बिनविरोध काढण्याच्या तडजोडी मुखेड येथे माजी आ़ अविनाश घाटे यांच्या निवासस्थानी पार पडली़
या तडजोडीत भाजपाच्या भास्करराव गटाचे कापूस उत्पादक शेतकरी गटातून भास्कर भिलवंडे, व्यंकटराव पुयड, गंगाधर नरवाडे, अनंतराव पळनीटकर, माधवराव सुगावे, भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून सूर्यकांत यन्नलवार, महिला प्रतिनिधी गटातून सुरेखा कन्ने, अनुसयाबाई भारती, तर बिगर कापूस शेतकरी गटातून भास्करराव पाटील खतगावकर, बाबूराव शिंदे, एकनाथ पाटील, तर काँग्रेसकडून कापूस उत्पादक मतदारसंघातून गंगाधर भिंगे, शिवाजी पाटील बेळीकर, नारायण ताडकोले व त्र्यंबक पाटील हंगरगेकर, नीळकंठ शिंदे, अनुसूचित जाती जमाती गटातून मोगलाजी शिरसेटवार तर इतर मागास प्रवर्गातून बालाजी सोनटक्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली़
निवडीनंतर घाटे यांच्या निवासस्थानी खतगावकर गटाच्या विजयी उमेदवारांचा भाजपा-शिवसेना मुखेड शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला़
भाजपा सेनेच्या वरील मान्यवरांसह लक्ष्मण ठक्करवाड, गोपाळ पाटील राजूरकर, नामदेव पाटील जाहूरकर, वसंत संबुटवाड, गणपत गायकवाड, बालाजी पाटील कबनूरकर, अवधूत भारती, व्यंकटराव लोहबंदे, अभय पाटील राजूरकर, सुभाष पवार, दत्ता पाटील जिगळेकर, अशोक पाटील मुगावकर, शिवाजी पा़चिवळीकर, बाळू पाटील केसराळीकर, अनंतराव बिराजदार, विलास पाटील राजूरकर, नागनाथ लोखंडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते़ (वार्ताहर)

Web Title: Nrusinh Sutagiri election uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.