तलाठ्यासाठी अर्जांची संख्या १९ हजारांवर

By Admin | Published: August 25, 2016 11:43 PM2016-08-25T23:43:24+5:302016-08-25T23:45:46+5:30

परभणी : जिल्हा प्रशासनाच्या तलाठी पदाच्या १६ जागांसाठी उमेदवारी अर्जांची संख्या आता १९ हजारांवर पोहचली आहे़ तलाठ्याच्या पदभरतीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची ही पहिलीच वेळ आहे़

Number of applications for deposit of 19 thousand | तलाठ्यासाठी अर्जांची संख्या १९ हजारांवर

तलाठ्यासाठी अर्जांची संख्या १९ हजारांवर

googlenewsNext

परभणी : जिल्हा प्रशासनाच्या तलाठी पदाच्या १६ जागांसाठी उमेदवारी अर्जांची संख्या आता १९ हजारांवर पोहचली आहे़ तलाठ्याच्या पदभरतीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची ही पहिलीच वेळ आहे़
जिल्हा प्रशासनाने महसूल शाखेतील तलाठ्याच्या पदाबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयातील ३ लिपिक आणि सह निबंधक कार्यालयातील ७ लिपिकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे़ त्यासाठी उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले़ २५ आॅगस्ट ही अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख होती़ २४ आॅगस्टपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे तलाठी या पदासाठी १४ हजार अर्ज प्राप्त झाले होते़ एकाच दिवसांत या अर्जांमध्ये ५ हजार अर्जांची भर पडली असून, गुरुवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे १९ हजार १४० उमेदवारी अर्ज आॅनलाईन दाखल झाले आहेत़ सायंकाळी ६ वाजेपर्यत हे अर्ज स्वीकारले जाणार होेते़ त्यामुळे या दोन तासांत अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे़ त्यामुळे परीक्षा प्रक्रिया राबविताना प्रशासनाची धापवळ होणार आहे़

Web Title: Number of applications for deposit of 19 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.