जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा दोनशेपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:04 AM2021-06-06T04:04:11+5:302021-06-06T04:04:11+5:30

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या दोनशेपार गेली. दिवसभरात २११ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात ...

The number of corona patients in the district again doubled | जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा दोनशेपार

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा दोनशेपार

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या दोनशेपार गेली. दिवसभरात २११ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ६३, तर ग्रामीण भागातील १४८ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यांतील ३ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २ हजार ५६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबादेत काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिलासा व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या दीडशेच्या घरात आली. रुग्णसंख्या घटल्याने निर्बंधही कमी केले जात आहेत. या सगळ्यात मात्र गेल्या ४ दिवसांपासून कोरोनाचा आलेख वाढताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ६६४ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३७ हजार ८३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ९९ आणि ग्रामीण भागातील २०९, अशा ३०८ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना वीरगाव, वैजापूर येथील येथील २८ वर्षीय महिला, शाहबाजार येथील ८४ वर्षीय पुरुष, हिरडपुरी, पैठण येथील ७० वर्षीय पुरुष, गेवराई, पैठण येथील ८५ वर्षीय पुरुष, देवगाव तांडा, पैठण येथील ७० वर्षीय पुरुष, शहरातील ८३ वर्षीय पुरुष, नागेश्वरवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, विहामांडवा, पैठण येथील ३९ वर्षीय पुरुष, सुलीभंजन, खुलताबाद येथील ३८ वर्षीय पुरुष, पोरगाव, पैठण येथील ३६ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ६२ वर्षीय महिला आणि नाशिक जिल्ह्यातील ४५ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय पुरुष, अहमदनगर जिल्ह्यातील ४८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

घाटी परिसर ४, अन्य १, सातारा परिसर २, एन-७ सिडको २, खाराकुआ ४, वर्धमान रेसिडेन्सी १, पडेगाव १, रामजीनगर १, मुकुंदवाडी २, एन-९, सिडको १, एन-८ २, एन-५ येथे २, एन-९, हडको १, गारखेडा ३, साईनगर २, हनुमाननगर १, नाथ प्रांगण १, गणेशनगर १, नारेगाव १, एन-१३ येथे १, कॅनॉट प्लेस १, एन-१, सिडको १, अयोध्यानगर २, भावसिंगपुरा १, मिटमिटा १, पदमपुरा १, विमानतळ परिसर १, मेल्ट्रॉन हॉस्पिटल १, नारळीबाग १, अन्य १९.

ग्रामीण भागातील रुग्ण

रांजणगाव ३, कन्नड ३, गंगापूर २, झाल्टा १, पिंपळखेडा १, बजाजनगर ५, सिडको महानगर १, वडगाव कोल्हाटी १, सिल्लोड २, पैठण १, अन्य १२८.

--------

कोरोनाची रोजची स्थिती

तारीख- रुग्ण

२९ मे -२२८

३० मे- २२९

३१ मे-२१६

१ जून - १५७

२ जून -१८५

३ जून -१८६

४ जून-१९३

५ जून-२११

Web Title: The number of corona patients in the district again doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.