जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या दीड लाखाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:04 AM2021-07-20T04:04:01+5:302021-07-20T04:04:01+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एकदा काही प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ झाली. दिवसभरात ४७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात ...
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एकदा काही प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ झाली. दिवसभरात ४७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील १७, ग्रामीण भागातील ३० रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ३५ जणांना सुटी देण्यात आली, तर उपचार सुरू असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या १ लाख ४७ लाख १९ झाली आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या २० खाली आली होती. परंतु, ही संख्या सोमवारी वाढली. जिल्ह्यात सध्या २८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील २६१ आणि शहरातील २८ रुग्णांचा समावेश आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात सक्रिय म्हणजे उपचार घेणाऱ्या रुग्णांसह नव्या निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या शहराच्या तुलनेत अधिक राहत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार २५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४७५ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील नऊ आणि ग्रामीण भागातील २६ अशा ३५ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना कबाडीपुरा येथील ५९ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
दशमेशनगर १, डीपीएस संकुल १, गारखेडा परिसर ३, कडा भवन १,शिवाजीनगर १, सातारा परिसर २, ज्योतीनगर १, मुकुंदवाडी १, यासह विविध भागांत ६ रुग्णांची वाढ झाली.
ग्रामीण भागातील रुग्ण
गंगापूर १०, कन्नड २, सिल्लोड २, वैजापूर १३, पैठण ३