जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या १२००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:05 AM2020-12-31T04:05:01+5:302020-12-31T04:05:01+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात ३ दिवसांनंतर बुधवारी पुन्हा कोरोना मृत्यूचक्र सुरू झाले. उपचार सुरू असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. ...
औरंगाबाद : जिल्ह्यात ३ दिवसांनंतर बुधवारी पुन्हा कोरोना मृत्यूचक्र सुरू झाले. उपचार सुरू असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत एकूण १२०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ६८ कोरोनारुग्णांची भर पडली, तर ४८ जण कोरोनामुक्त झाले.
औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ५४४ एवढी झाली आहे. तर ४३ हजार ८७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या ४६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ६८ रुग्णांत मनपा हद्दीतील ६०, ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ३७ आणि ग्रामीण भागातील ११ अशा एकूण ४८ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली.
मनपा हद्दीतील रुग्ण
भगवती कॉलनी ६, श्रेयनगर १, एन-३, सिडको १,एन-५, सिडको १, चिकलठाणा १, कटकट गेट १, पुंडलिकनगर १, एन-३, सिडको १, भावसिंगपुरा १, टी.व्ही. सेंटर २, मिल्ट्री हॉस्पिटल परिसर १, देवळाई रोड सातारा परिसर १, क्रांती चौक १, सिव्हील हॉस्पिटल १, नागेश्वरवाडी २, कांचनवाडी १, चेलीपुरा १, पडेगाव १, गारखेडा ३, प्रतापगडनगर, सिडको १, भानुदासनगर १,मंजीत प्राईड १, उस्मानपुरा १, बीड बायपास १, अन्य २७.
ग्रामीण भागातील रुग्ण
पाचोड २, रांजणगाव १, अन्य ५
सलग चौथ्या दिवशी घाटीत मृत्यू नाही
सलग चौथ्या दिवशी घाटीत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना ऊर्जानगर, सातारा परिसरातील ६० वर्षीय पुरुष, राजाबाजार येथील ७४ वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात मृत्यू झाला.