शौचालय बांधणीत लाखाचा आकडा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:19 PM2017-10-31T23:19:58+5:302017-10-31T23:20:21+5:30

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पाणंदमुक्ती अभियानात बीड जिल्ह्याने मोठी आघाडी घेतली असून, सहा महिन्यांच्या कालावधीत शौचालय उभारण्याचा १ लाखाचा आकडा पार केला आहे.

The number of lacs in the construction of toilets is crossed | शौचालय बांधणीत लाखाचा आकडा पार

शौचालय बांधणीत लाखाचा आकडा पार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पाणंदमुक्ती अभियानात बीड जिल्ह्याने मोठी आघाडी घेतली असून, सहा महिन्यांच्या कालावधीत शौचालय उभारण्याचा १ लाखाचा आकडा पार केला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत १ लाख ४२६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. त्याचबरोबर राज्याच्या रँकमध्ये बीड जिल्ह्याने मोठी उडी घेत २३ वा क्रमांक प्राप्त केला.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात पाणंदमुक्तीची चळवळ अधिक बळकट झाली आहे. दोन वर्षांआधी बीड जिल्हा शौचालय उभारणीत पिछाडीवर होता. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी या अभियानात झोकून दिले. पहाटे गावांमध्ये सायकल फेरी काढून तर कधी ‘गुड मॉर्निंग’ पथकाच्या माध्यमातून लोटाबहाद्दरांमध्ये धडकी भरवून उघड्यावर शौचास जाण्यास परावृत्त केले. त्यानंतर विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला यांनीही या मोहिमेत लक्ष घातले आणि जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधत ही मोहीम जोरदारपणे सुरू ठेवली. तालुका आणि जिल्हा पातळीवरील ६०० कर्मचा-यांचा ताफा ६५ पथकांमध्ये विभागून गुड मॉर्निंग सुरू केले. यातून लोकजागृती करीत आरोग्याचे महत्व पटवून दिले. जनतेतूनही प्रतिसाद मिळाला. स्वच्छताप्रेमी जनतेच्या मदतीने स्वच्छतेची दिवाळी साजरी केल्यानंतर आॅक्टोबरमध्ये जिल्ह्याने विक्रम केला. २ महिन्यांत उर्वरित उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक म्हणाले.

Web Title: The number of lacs in the construction of toilets is crossed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.