रुग्णसंख्या पुन्हा दुहेरीत, ७८ नव्या रुग्णांची वाढ

By | Published: December 2, 2020 04:05 AM2020-12-02T04:05:23+5:302020-12-02T04:05:23+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात ९ दिवसांनंतर सोमवारी (दि. ३०) पुन्हा एकदा नव्या रुग्णांची संख्या तिहेरी आकड्यावरून दुहेरी संख्येत आली. दिवसभरात ...

Number of patients doubles, 78 new patients added | रुग्णसंख्या पुन्हा दुहेरीत, ७८ नव्या रुग्णांची वाढ

रुग्णसंख्या पुन्हा दुहेरीत, ७८ नव्या रुग्णांची वाढ

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात ९ दिवसांनंतर सोमवारी (दि. ३०) पुन्हा एकदा नव्या रुग्णांची संख्या तिहेरी आकड्यावरून दुहेरी संख्येत आली. दिवसभरात कोरोनाच्या ७८ नव्या रुग्णांची वाढ झाली आणि उपचार पूर्ण झालेल्या ६४ रुग्णांना सुटी देण्यात आली. तर ३ रुग्णांंचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४३,३७८ एवढी झाली आहे. यातील ४१,२४० रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत. तर १,१४८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ९९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ७८ रुग्णांत मनपा हद्दीतील ६५, ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २७ आणि ग्रामीण भागातील ३७ अशा ६४ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना एन -७ , सिडकोतील ७५ वर्षीय पुरुष, शिवशंकर कॉलनीतील ५० वर्षीय पुरुष, आपतगाव येथील ६२ वर्षीय स्त्री कोरोना कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

बेगमपुरा १, गजानन कॉलनी, गारखेडा २, घाटी परिसर १, पैठण रोड १, चिनार गार्डन १, गुरूप्रसाद नगर, बीड बायपास १, रेल्वेस्टेशन परिसर ३, अरिहंतनगर ३, उल्कानगरी २, अन्य ४२, उस्मानपुरा ४, कासारीबाजार २, नेहरू चौक १, गारखेडा परिसर १

ग्रामीण भागातील रुग्ण

गंगापूर १, कन्नड २, अन्य १०

Web Title: Number of patients doubles, 78 new patients added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.