रुग्णसंख्या झपाट्याने वाढली; महापालिका शहरात २१ कोविड केअर सेंटर सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 02:03 PM2021-03-17T14:03:32+5:302021-03-17T14:05:13+5:30

The number of corona patients increased rapidly in Aurangabad दररोज पॉझिटिव्ह येणार्‍या नागरिकांपैकी ६० टक्के नागरिक महापालिकेच्या सीसीसीमध्ये दाखल होत आहेत.

The number of patients increased rapidly; Municipal Corporation will start 21 Kovid Care Centers in the city | रुग्णसंख्या झपाट्याने वाढली; महापालिका शहरात २१ कोविड केअर सेंटर सुरू करणार

रुग्णसंख्या झपाट्याने वाढली; महापालिका शहरात २१ कोविड केअर सेंटर सुरू करणार

googlenewsNext
ठळक मुद्दे१ मार्चपासून महापालिकेने मोठ्या प्रमाणात तपासण्या सुरू केल्या.दररोज चार ते पाच हजार तपासण्या करण्यात येत आहेत.

औरंगाबाद : शहरात दररोज एक हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार कुठे करावेत? असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. युद्धपातळीवर २१ कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यातील नऊ केंद्र सुरूही झाले. आज सुरू केलेले केंद्र दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हाऊसफुल्ल होत आहे. दररोज एक नवीन केंद्र उघडण्याची लगबग महापालिकेला करावी लागत आहे.

१ मार्चपासून महापालिकेने मोठ्या प्रमाणात तपासण्या सुरू केल्या. दररोज चार ते पाच हजार तपासण्या करण्यात येत आहेत. महापालिकेच्या काही तपासणी केंद्रांवर नागरिकांनी लांबलचक रांगाही लावलेल्या आहेत. किरकोळ ताप असला तरी नागरिक तपासणीसाठी धाव घेत आहेत. १०० नागरिकांची तपासणी केली, तर किमान २५ ते ३० पॉझिटिव्ह येत आहेत. आर्थिक परिस्थिती उत्तम असलेले नागरिक थेट खासगी रुग्णालयात दाखल होत आहेत. काही नागरिक महापालिकेच्या कोविड केअर सेंटरवर अवलंबून आहेत. महापालिका त्यांना जेवण आणि मोफत उपचारही देत आहे. कोरोनाचा संसर्ग थांबावा म्हणून विकेंडला दोन दिवस लॉकडाऊन, कडक निर्बंध प्रशासनाकडून लादणे सुरू केले आहे. यानंतरही कोरोनाची साखळी ब्रेक व्हायला तयार नाही. एकाच कुटुंबातील किमान तीन ते चार नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत. दररोज पॉझिटिव्ह येणार्‍या नागरिकांपैकी ६० टक्के नागरिक महापालिकेच्या सीसीसीमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याने युद्धपातळीवर कंत्राटी कर्मचारी भरती महापालिकेने सुरू केली आहे.

सध्या सुरू असलेल्या सीसीसी सेंटरचा तपशील : सीसीसी सेंटर-क्षमता-सध्या रुग्ण
मेल्ट्रोन हॉस्पिटल-३००-२७१
एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स-८८-६८
एमआयटी बॉइज् होस्टेल-२७० -२८१
किलेअर्क होस्टेल - ३०० - २७२
ईओसी पदमपुरा - ६२ -६१
सीएसएमएसएस महाविद्यालय - ८३-८५
सिपेट - २७७ - ६६
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय - २५४-२५१
शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालय - १८० -१५६
पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय - १२५ - सुरू

नवीन सीसीसीचे नियोजन : केंद्राचे नाव - रुग्ण क्षमता
देवगिरी बॉइज् होस्टेल-२५०
पदमपुरा गर्ल्स हॉस्टेल-८०
विभागीय क्रीडा संकुल-४००
आयआयएचएम बॉइज होस्टेल-१२९
विद्यापीठातील साई संस्था-२७०
विद्यापीठातील बॉइज् होस्टेल-९३
विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेल-९८
यशवंत गर्ल्स हॉस्टेल-१०८
नवखंडा महाविद्यालय-९३
जामा मशीद-१०५
कलाग्राम-७५

Web Title: The number of patients increased rapidly; Municipal Corporation will start 21 Kovid Care Centers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.