शिष्यवृती परीक्षेची विद्यार्थी संख्या ५० टक्क्यांनी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 09:44 PM2018-11-30T21:44:42+5:302018-11-30T21:44:54+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नोंदणी करणाºया परीक्षार्थींची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी, विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षण विभागास अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे.

पाचवी आणि आठवीसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी होणार आहे. यासाठी अर्ज करण्याकरिता १९ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला होता; परंतु मध्ये दिवाळीच्या सुट्या आणि प्रतिसाद न मिळाल्याने १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे; परंतु मुदवाढ दिली असली तरी विद्यार्थी नोंदणी संख्या ही निम्म्याने घटल्याने शिक्षण विभागातील अधिकाºयांकडून चिंता व्यक्त होत आहे. आतापर्यंत मराठवाड्यातून मोठ्या संख्येने शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी बसत आले आहेत.
२०१८ च्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ५२ हजार ८५९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यावर्षी ही संख्या २६ हजार ३७८ एवढी घसरली आहे, तर आठवीसाठी २०१८ मध्ये ४६ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यावर्षी ही संख्या १७ हजार ४०४ एवढी असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी दिली. गेल्या वर्षीपासून आठवी आणि पाचवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचा नियम करण्यात आला, याचादेखील परिणाम परीक्षा अर्ज नोंदणीवर दिसून येत आहे.