हजसाठी इच्छुकांची संख्या वाढली
By Admin | Published: February 16, 2016 11:54 PM2016-02-16T23:54:58+5:302016-02-17T00:46:26+5:30
औरंगाबाद : हज यात्रा २०१६ साठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया मागील महिन्यात सुरू करण्यात आली होती. केंद्रीय हज कमिटीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील ४ हजार ९७८ भाविकांनी अर्ज केले.
औरंगाबाद : हज यात्रा २०१६ साठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया मागील महिन्यात सुरू करण्यात आली होती. केंद्रीय हज कमिटीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील ४ हजार ९७८ भाविकांनी अर्ज केले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अर्जांची संख्या वाढली आहे.
केंद्रीय हज कमिटीने डिसेंबर महिन्यात अर्ज प्रक्रिया सुरूकेली. भाविकांच्या मागणीनंतर अर्ज करण्यासाठी आठ दिवसांचा अवधी वाढवून देण्यात आला होता. १४ फेब्रुवारी रोजी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. औरंगाबाद जिल्ह्यातून सुमारे ५ हजार नागरिकांनी अर्ज केल्याची माहिती मरकज-ए-हुज्जाज कमिटीचे करीम पटेल यांनी दिली. पाच हजार अर्जांमध्ये ३ हजार ८६६ अर्ज सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. १ हजार ११२ अर्ज राखीव प्रवर्गातील आहेत. राखीव प्रवर्गात ७० वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि मागील तीन वर्षांपासून अर्ज करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. राखीव प्रवर्गातील नागरिकांना यंदा हजला जाण्याची संधी मिळणार आहे. मागील वर्षीही साडेचार हजार नागरिकांनी अर्ज केले होते. त्यातील ७५९ जणांना पवित्र हज यात्रेला जाण्याची संधी मिळाली होती.
मराठवाड्यातील आणि अहमदनगर, बुलडाणा आदी जिल्ह्यांतील नागरिकही दरवर्षी चिकलठाणा विमानतळावरूनच हज यात्रेला जातात.