छत्रपती संभाजीनगरात घाटी, जिल्हा रुग्णालयात परिचारिकांचे काम बंद आंदोलन
By संतोष हिरेमठ | Updated: February 20, 2025 11:29 IST2025-02-20T11:27:56+5:302025-02-20T11:29:34+5:30
या आंदोलनामुळे रुग्णालयातील सेवा विस्कळीत होत आहेत.

छत्रपती संभाजीनगरात घाटी, जिल्हा रुग्णालयात परिचारिकांचे काम बंद आंदोलन
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. घाटीत महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन आणि जिल्हा रुग्णालयात जिल्हा नर्सेस फेडरेशन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
सकाळी ७:३० वाजल्यापासून नर्सेसनी आपले काम थांबवले असून, या आंदोलनामुळे रुग्णालयातील सेवा विस्कळीत होत आहेत. घाटीत नर्सिग होस्टेल परिसरात परिचारिकांनी जोरदार घोषणा देत मागण्यांकडे लक्ष वेधले. यावेळी राज्य अध्यक्ष इंदुमती थोरात, अध्यक्ष शुभमंगल भक्त, द्रौपदी कर्डीले, महेंद्र सावळे, सैय्यद नवाज, प्रतिभा अंधारे, प्रवीण व्यवहारे, वंदना कोळनूरकर, कलिंदि इधाटे आदी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयात शाखेच्या अध्यक्षा शुभागी राक्षे , उपाध्यक्षा जना मुंडे, सललागार, अनिता नागरगोजे, डॉ. प्रशांत सोनटक्के, दिपक भदाने आदी उपस्थित होते.