दिवाळीनिमित्त युवकांकडून अनाथांना नवे कपडे आणि फटक्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 08:26 PM2018-11-01T20:26:37+5:302018-11-01T20:27:09+5:30
युवकांच्या मैत्रेय ग्रुपच्या वतीने दिवाळीनिमित्त अनाथ आश्रमातील मुला- मुलींना नवीन कपडे, दैनदिन वापराच्या वस्तू व फटाके भेट देऊन दिवाळी साजरी केली.
औरंगाबाद: युवकांच्या मैत्रेय ग्रुपच्या वतीने दिवाळीनिमित्त अनाथ आश्रमातील मुला- मुलींना नवीन कपडे, दैनदिन वापराच्या वस्तू व फटाके भेट देऊन दिवाळी साजरी केली.
सातारा परिसरातील या अनाथ आश्रमात यंदा आजी-आजोबा, मुले आणि मुली अशी तब्बल २६५ जन आहेत. दिवाळीत या सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी मैत्रेय ग्रुपने त्यांना मदत करण्याचे ठरवले. यात प्रिया विप्र, अनिल घाटिया, शिरीष बागवे, मंगेश सुरडकर, प्रल्हाद अग्रवाल, केतकी टाकळकर, बालाजी नारगुडे,नंदकुमार माने, बागेश दुबे, नयन तिवारी, धीरज गोकलानी,पूजा ठोले, विक्की भागवत, मोहित लोळगे, केयूर शहा, सायली विप्र ,ज्योती खर्चे, मानसी चव्हाण यांनी नातेवाईक व मित्रपरिवारांकडून आश्रमात दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम मांडला.
यावरून भगवानबाबा बालिकाश्रम , योगेश्वरी बालकाश्रम, गजानन बालसदन, बाबासाई आश्रम व मुक्तीसोपान वृद्धाश्रमातील आजी- आजोबा, आणि चिमुल्या मुला-मुलींसोबत या सर्वांनी दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी सर्वाना नवे कपडे, दैनदिन वापराच्या वस्तू, फटाक्यांची भेट दिली. दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना या युवा ग्रुपकडून मोफत मार्गदर्शन केले जाते. या आश्रमातील कोणीच एकटे नाही आम्ही त्यांच्यासोबत आहोत असा शुभेच्छा संदेश युवकांनी यावेळी दिला.