ओशियन रियलिटर्स "सेक्टर्स ४१" भव्य प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:02 AM2021-02-21T04:02:07+5:302021-02-21T04:02:07+5:30
ओशियन रियलिटर्स इंडिया प्रा.लि सचिन पाटील संचालक ओशियन रियलिटर्स इंडिया प्रा. लि.चा सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प शेंद्रा येथे ''सेक्टर्स ४१'' ...
ओशियन रियलिटर्स इंडिया प्रा.लि
सचिन पाटील
संचालक
ओशियन रियलिटर्स इंडिया प्रा. लि.चा सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प शेंद्रा येथे ''सेक्टर्स ४१'' मार्च महिन्यात लाँच होत आहे. मात्र, ''लोकमत प्रॉपर्टी शो २०२१'' प्रदर्शनात प्रीलाँच ऑफर व माहिती दिली जात आहे. स्वतःचे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी कर्ज काढून ते घर खरेदी केले जाते. त्यासाठी आयुष्यभराची कमाई लावतात. त्या बदल्यात त्यांना चांगले दर्जेदार घर मिळावे, त्यांना व त्यांच्या पुढील पिढीला इथे आनंदाने राहता यावे यासाठीच ओशियन रियलिटर्स इंडिया प्रा.लि.ची स्थापना झाली. शेंद्रा एमआयडीसी परिसरातील ''सेक्टर्स ४१'' या २७ एकरवरील ११०० ते ४००० स्केअर फुटाचे प्लॉट तयार करण्यात आले आहेत.
भव्य प्लॉटस्च्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सिमेंटचा रस्ता, फुटपाथ, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक, पाण्याची पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, पथदिवे या मूलभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. याशिवाय क्लब हाऊस, जीम, स्वीमिंग पूल, इनडोअर, आऊटडोअर गेम, योगा- मेडिटेशन केंद्र जिथे पाण्याचा झरा वाहत राहील असे ठिकाण निर्माण करण्यात आले आहे. २०० ते २५० लोकांची क्षमता असलेले लॉन्स, ओपन थिएटर आदी अमेनिटी देण्यात आल्या आहेत. जालना रोडपासून प्रकल्पापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता, प्रकल्पाला चार प्रवेशद्वार, संपूर्ण प्रकल्पच नव्हे, तर आसपासचा संपूर्ण परिसर दिसेल असे खास तीन-चार मजली उंच मनोरा तयार करण्यात आला आहे. अत्यंत सुरक्षित ठिकाण असल्याने, प्लॉट खरेदी केल्यावर लगेच बांधकाम करून राहण्यासाठी जाऊ शकता.