भाडेकरूची माहिती दडविणाऱ्यांविरोधात गुन्हे
By Admin | Published: December 19, 2015 11:54 PM2015-12-19T23:54:18+5:302015-12-20T00:08:18+5:30
बापू सोळुंके, औरंगाबाद नोकरी, कामधंद्यानिमित्त विविध राज्यांतील आणि विदेशातील नागरिक शहरात घर भाड्याने घेऊन राहतात. यात गुन्हेगारांचा समावेश असतो. अशा गुन्हेगारांना घर भाड्याने देणे धोकादायक असते.
बापू सोळुंके, औरंगाबाद
नोकरी, कामधंद्यानिमित्त विविध राज्यांतील आणि विदेशातील नागरिक शहरात घर भाड्याने घेऊन राहतात. यात गुन्हेगारांचा समावेश असतो. अशा गुन्हेगारांना घर भाड्याने देणे धोकादायक असते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील भाडेकरूंची माहिती देण्यासंदर्भात स्वतंत्र अधिसूचना जारी केलेली आहे. असे असताना भाडेकरुंची माहिती दडविणाऱ्या घरमालकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याची मोहीम दहशतवादविरोधी पथकाकडून सुरू करण्यात आली आहे. या पथकाने आतापर्यंत १०५ घरमालकांविरोधात गुन्हे दाखल केल्याचे समोर आले आहे.
ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा औद्योगिक विकास झपाट्याने सुरू आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे त्यात आता भर पडली आहे. नोकरी, कामधंदा आणि शिक्षणासाठी औरंगाबादेत नव्याने