सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा
By Admin | Published: June 24, 2017 11:40 PM2017-06-24T23:40:40+5:302017-06-24T23:44:45+5:30
आष्टी : संशयिताला जेलमध्ये न पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर शनिवारी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : संशयिताला जेलमध्ये न पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर शनिवारी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव पंकज जाधव, असे आहे.
आष्टी येथील एक शेतकऱ्याच्या सालगड्याने आष्टी पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दिली होती. त्यांनी आष्टी ठाण्याचे तात्कालीन सहायक निरीक्षक पंकज जाधव याची भेट घेतली. प्रकरण मिटविण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक पंकज जाधव याने वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती पाच हजार रुपये लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली.
मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने त्या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने पडताळणी करून २९ मे रोजी सापळा रचला. तक्रारदारास पंचासोबत सहायक पोलीस निरीक्षक जाधव याच्या कक्षात पाठविले. त्यावेळी जाधव याने लाच न स्वीकारता तक्रारदारास सकाळी येण्यास सांगितले.
दरम्यान, दोघांमध्ये झालेल्या संभाषणाच्या आधारे जाधव याने पाच हजारांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र देविदास निकाळजे यांनी जाधव विरुद्ध आष्टी ठाण्यात फिर्याद दिली.