वापरण्यासाठी दिलेली यंत्रे परस्पर नेणाऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:04 AM2021-01-08T04:04:46+5:302021-01-08T04:04:46+5:30

गोलू कुमार (रा. जयभवानीनगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार सचिन सुशील कोरे (वय ३५, रा. जाधववाडी)यांनी त्यांच्या मालकीचे ...

Offenses against recipients of devices provided for use | वापरण्यासाठी दिलेली यंत्रे परस्पर नेणाऱ्यावर गुन्हा

वापरण्यासाठी दिलेली यंत्रे परस्पर नेणाऱ्यावर गुन्हा

googlenewsNext

गोलू कुमार (रा. जयभवानीनगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार सचिन सुशील कोरे (वय ३५, रा. जाधववाडी)यांनी त्यांच्या मालकीचे कटर मशीन, ग्राईंडर, ड्रिल मशीन आणि अवजारे असे सुमारे ४० हजारांचे साहित्य आरोपीला वापरण्यासाठी दिले होते. वापर झाल्यावर हे साहित्य परत रुममध्ये ठेवून देण्यास त्याला सांगितले होते. मात्र, ४ जानेवारी रोजी आरोपी गोलूने नरवडे यांच्याकडून रुमची चावी घेऊन खोलीतून परस्पर काढून नेले. दुसऱ्या दिवशी हा प्रकार तक्रारदार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी क्रांती चौक ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नाईक कॉस्टेबल फिरंगे तपास करीत आहेत.

=====================

तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद: कोणत्यातरी कारणावरून रवी सोमनाथ साबळे (वय ३८, रा. आंबेडकरनगर )या तरुणाने बुधवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. रवीने गळफास लावल्याचे दिसताच नातेवाईकानी त्यांना फासावरुन उतरवून तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद सिडको पोलीस ठाण्यात घेण्यात आली.

Web Title: Offenses against recipients of devices provided for use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.