कार्यालय दुरूस्तीची चौकशी
By Admin | Published: August 9, 2015 12:21 AM2015-08-09T00:21:33+5:302015-08-09T00:27:28+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गत अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गत अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यावर याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी यांच्या दालनाची दुरूस्ती करताना शासनाने घालून दिलेले नियम पाळले नसल्याची तक्रार धुरगुडे यांनी केली होती. तीन लाखांवरील कामाचे इ-टेंडरिंग करणे अपेक्षित असतानाही प्रशासनाने या प्रक्रियेला बगल देत कामे केली. तसेच काही कामे तीन लाखांच्या आत बसविण्यासाठी अडीच ते तीन लाख रूपये किमतीच्या कामांचे तुकडे पाडल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले होते. याची दखल घेत विभागीय आयुक्तांनी उपरोक्त मुद्यांच्या अनुषंगाने चौकशी करून स्वयंस्पष्ट वस्तुनिष्ठ अहवाल कागदपत्रासह तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सदरील पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामळे चौकशीतून काय पुढे येते? याकडे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)