नवºयाच्या हातकड्या घेऊन पत्नी अधीक्षक कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:08 AM2017-09-23T01:08:52+5:302017-09-23T01:08:52+5:30

शहरातील शिवाजीनगर भागातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीला यथेच्छ धुलाईनंतर सोडून दिले, परंतु त्याच्या पायात घातलेल्या हातकडीचा मात्र पोलिसांना विसर पडला़ संशयिताने घरी येवून दगडाने ती हातकडी तोडली़ त्यानंतर ती हातकडी घेवून संशयिताच्या पत्नीने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयच गाठले़ त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़

In the office of the Superintendent of Police, taking the handcuffs of Neo | नवºयाच्या हातकड्या घेऊन पत्नी अधीक्षक कार्यालयात

नवºयाच्या हातकड्या घेऊन पत्नी अधीक्षक कार्यालयात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील शिवाजीनगर भागातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीला यथेच्छ धुलाईनंतर सोडून दिले, परंतु त्याच्या पायात घातलेल्या हातकडीचा मात्र पोलिसांना विसर पडला़ संशयिताने घरी येवून दगडाने ती हातकडी तोडली़ त्यानंतर ती हातकडी घेवून संशयिताच्या पत्नीने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयच गाठले़ त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़
विमानतळ ठाणे हद्दीत झालेल्या एका चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी शिवाजीनगर भागातून एका संशयिताला ताब्यात घेतले़ त्यानंतर त्याला घेवून थेट त्यांनी अर्धापूर गाठले़ या ठिकाणी हे सर्वजण एका धाब्यावर जेवणासाठी थांबले़ जेवणादरम्यान सदर संशयित आरोपी पसार होऊ नये म्हणून या कर्मचाºयांनी त्याच्या पायात बेड्या घातल्या़ तत्पूर्वी त्याची यथेच्छ धुलाईही करण्यात आली़ या प्रकरणाची कुठेही नोंद करण्यात आली नव्हती, हे विशेष! मारहाणीनंतर पोलिसांनी या आरोपीला सोडून दिले़ यावेळी त्याच्या पायात घातलेली हातकडी काढून घ्यायचे पोलीस विसरले. त्यामुळे सदर इसमाने पायातील हातकडीसह थेट घर गाठले़ घरी आल्यानंतर दगडाने पायातील हातकडी तोडली, परंतु पुन्हा पोलीस येतील या भीतीने त्याने घरातून धूम ठोकली़
नवरा हातकड्या टाकून घरातून गेल्यानंतर या हातकड्याचे करायचे काय? असा प्रश्न पत्नीसमोर उभा राहिला. पत्नीने सासूसह तुटलेल्या या हातकड्या घेऊन थेट वजिराबाद येथे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले़ परंतु त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाºयांनी सदर हातकड्या घेण्यास नकार देत त्यांना पिटाळून लावले़ त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला़ दरम्यान याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.

Web Title: In the office of the Superintendent of Police, taking the handcuffs of Neo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.