पीएसएमच्या बैठकीला अधिका-यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:00 AM2017-11-28T00:00:09+5:302017-11-28T00:00:16+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रम अंतर्गत हिंगोली येथील डायट महाविद्यालयात २७ नोव्हेंबर रोजी सीईओंच्या सूचनेनुसार आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शिक्षण विभागातील अनेक अधिका-यांनी दांडी मारली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रम अंतर्गत हिंगोली येथील डायट महाविद्यालयात २७ नोव्हेंबर रोजी सीईओंच्या सूचनेनुसार आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शिक्षण विभागातील अनेक अधिका-यांनी दांडी मारली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठकीस उपस्थित राहण्याच्या सक्त सूचना असूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
हिंगोली येथील डायट महाविद्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीस डीयाईसीपीडीचे प्राचार्य जी. एस. शिंदे, शिक्षणाधिकारी शिवाजी पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे, उपशिक्षणाधिकारी डी. के. इंगोले, गट शिक्षणाधिकारी नांदे, गट शिक्षणाधिकारी बगाटे आदीं उपस्थित होते. प्रधान सचिव यांनी लातूर येथील बैठकीतील मार्गदर्शक सूचने प्रमाणे २७ नोव्हेंबर रोजी बैठक बोलाविण्यात आली होती. त्या अनुषंगाने २०१७-१८ अंतर्गत तालुकास्तरावर राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी हिंगोली येथे बैठक बोलाविण्यात आली होती. शिवाय सदर बैठकीस संबंधित तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी तसेच केंद्र प्रमुखांना उपस्थित राहणे अनिवार्य होते. तशा सूचनाही संबधितांना दिल्या होत्या. परंतु जिल्ह्यातील ६८ केंद्रप्रमुखांपैकी ५८ केंद्रप्रमुख बैठकीस हजर होते. तर दोन गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे १० पैकी चक्क दोनच विस्तार अधिकारी गांभीर्य दाखवून उपस्थित राहिले. आठ विस्तार अधिकाºयांनी यावेळी नेहमीप्रमाणेच दांडी मारली.
संविधान दिन साजरा - सदर बैठकीत प्रथम संविधान दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी संविधान दिनाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच गट शिक्षणाधिकारी बगाटे यांनी यावेळी संविधानावर मनोगत व्यक्त केले.