अरे वाहह! वीज ग्राहकांना तक्रार नोंदविण्यासाठी ‘ऊर्जा चॅटबॉट’ मदतीला, अॅप करा डाउनलोड

By साहेबराव हिवराळे | Published: May 16, 2024 07:50 PM2024-05-16T19:50:21+5:302024-05-16T19:52:44+5:30

वीज ग्राहकांच्या घरबसल्या संवादपर मदतीसाठी २४ तास सेवा

Oh wow! 'Urja Chatbot' to Help Electricity Consumers to File Complaints | अरे वाहह! वीज ग्राहकांना तक्रार नोंदविण्यासाठी ‘ऊर्जा चॅटबॉट’ मदतीला, अॅप करा डाउनलोड

अरे वाहह! वीज ग्राहकांना तक्रार नोंदविण्यासाठी ‘ऊर्जा चॅटबॉट’ मदतीला, अॅप करा डाउनलोड

छत्रपती संभाजीनगर : इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅटबॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येत आहे तसेच नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा, तक्रार निवारण इ.बाबत माहिती घेण्याची सोय २४ तास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महावितरणच्या वीजसेवेसंदर्भात माहिती कुठे विचारावी आणि या सेवांचा घरबसल्या लाभ कसा घ्यावा, हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे. ग्राहक सेवांबाबत थेट प्रश्न विचारून विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी ‘ऊर्जा’ नावाचे चॅटबॉट महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केले आहे. राज्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ‘ऊर्जा’ चॅटबॉट ही वेबसाईट व महावितरणच्या मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे.

नवीन वीजजोडणी वा त्यासाठी केलेल्या अर्जाची सद्य:स्थिती, वीज बिल भरणा किंवा वीज बिलाचा तपशील, जलद वीज बिल भरणा, मोबाइल क्रमांक व ई-मेलची नोंदणी इतर विविध शुल्कांचा ऑनलाइन भरणा, स्वतः मीटर वाचन व सबमिशन, गो-ग्रीन नोंदणी, वीजवापर व बिलाचे कॅलक्युलेटर इ.बाबत वीज ग्राहकांना ‘ऊर्जा’ चॅटबॉट थेट मदत करीत आहे.

महावितरणच्या वीज सेवेबाबत माहिती हवी असल्यास ‘ऊर्जा’च्या माध्यमातून संबंधित सेवा ग्राहकांसाठी थेट ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. संबंधित सेवेची थेट लिंक ग्राहकांना या बॉटमधूनच मिळणार आहे. यासोबतच वीजपुरवठा खंडित होणे तसेच वीज बिलांसह इतर तक्रारींबाबत संपूर्ण माहिती वीज ग्राहकांना उपलब्ध होत आहे. यामध्ये तक्रार करण्यासाठी महावितरणचे २४ तास सुरू असलेले टोल फ्री क्रमांक, ‘एसएमएस’ क्रमांक, ई-मेल, मिस्ड कॉल सेवा इ.ची माहिती बॉटद्वारे उपलब्ध आहे. मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना मोबाइल क्रमांक किंवा ग्राहक क्रमांक सबमिट करून विविध सेवा घेण्यासाठी चॅटबॉटद्वारे महावितरणशी संवाद साधता येईल. तसेच इतर ग्राहकांना विविध सेवेचा लाभ घेता येत आहे.

Web Title: Oh wow! 'Urja Chatbot' to Help Electricity Consumers to File Complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.