सेवली येथे वृद्धाचा खून, तरूण गंभीर

By Admin | Published: August 12, 2015 12:45 AM2015-08-12T00:45:29+5:302015-08-12T00:57:24+5:30

सेवली : जालना तालुक्यातील सेवली येथे एका वृद्धाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. तर एक युवक यात गंभीर जखमी झाला आहे.

Old-fashioned murder of Savli, Tarun Gambhir | सेवली येथे वृद्धाचा खून, तरूण गंभीर

सेवली येथे वृद्धाचा खून, तरूण गंभीर

googlenewsNext


सेवली : जालना तालुक्यातील सेवली येथे एका वृद्धाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. तर एक युवक यात गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.हत्येचे कारण समजू शकले नाही.
मंठा तालुक्यातील भागडे सावरगाव येथील संतोबा मुंजाजी आघाम (६५) हे सेवली येथे आठवडी बाजारासाठी आले होते. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास येथील दारूच्या दुकानामागे असलेल्या एका कुडाच्या घरात रक्तबंबाळ अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. जवळच चाकूही आढळून आला. तसेच या घराजवळच प्रकाश बागडू खंदारे (२५, रा. सेवली) हा रक्तबंबाळ अवस्थेत गंभीर जखमी आढळून आला.
या घटनेची माहिती संतोष खंदारे याने सेवली पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. संतोबा आघाम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. तर गंभीर जखमी असलेल्या प्रकाश खंदारे यांच्यावर सेवली येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले.
या घटनेमागचे नेमके कारण कळू शकले नाही. दारू व पैशाच्या वादातून भांगडे व खंदारे यांच्यात वाद झाला असावा त्यातून ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, घटनेची माहिती देणाऱ्या संतोष खंदारे यास पोलिसांनी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Old-fashioned murder of Savli, Tarun Gambhir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.